चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या संग्रहालयाला दोन हजार वर्षपूर्व पासून ते सोळाव्या शतकापर्यंतची नाणी भेट मिळाली आहेत. यात मोर्यकाल, सातवाहन, कुशन, विश्नुकुंडी, वाकाटक, मुरुड-जंजिरा संस्थान अशी विविध कालखंडातील नाण्यांचा समावेश आहे.महाराष्ट्रातील नामवंत नाणी संग्राहक विनायक निजसुरे, गणेश नेणे, प्रशांत ठोसर, शैलेश मुळे, संदीप निजसुरे, गौरव लवेकर यांनी ही नाणी नुकतीच भेट दिली. या पार्श्वभूमीवर वाचनालयाने, इतिहासात कोकणावर जेवढ्या राजवटी झाल्या त्या सर्वांची नाणी या संग्रहालयात असावीत यासाठीचे प्रयत्न सुरु केले आहेत. नाणी संग्रहकांनी वाचनालयाच्या संग्रहालयातील वस्तू तसेच नाणी पाहून समाधान व्यक्त केले. संस्थेने साकारलेल्या कलादालनातील तैलचित्रांची माहिती घेवून यापुढे आम्ही ग्रंथालयाच्या संग्रहालयाला सर्वोतोपरी साहाय्य करणार असल्याचे नाणी संग्रहकांनी सांगितले. कोकणात इतके भरीव कार्य करणारी लोटिस्मा संस्था अभिमानास्पद असल्याचेही संग्रहकांनी सांगितले. ग्रंथालयाचे कार्यवाह विनायक ओक यांनी सर्वांना चिपळूण १९४२ हे पुस्तक भेट दिले. संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच संग्रहालय पुन्हा सुरु होणार असल्याचे ओक यांनी यावेळी सांगितले.
चिपळूणमधील लोकमान्य टिळक संग्रहालयास मिळाली दोन हजार वर्षपूर्व नाण्यांची भेट
By संदीप बांद्रे | Published: August 18, 2023 3:27 PM