कोविड १९ संपूर्ण शरीरावर, मनावर आणि मेंदूवर प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेनुसार परिणाम करते. अशावेळी फिनिओथेराप्युटीक आणि पुनर्वसन उपचारात पूर्वपदावर, पूर्वीसारखं जीवन सुरळीत व्हावं यासाठी आपण आता व्यायाम करणार आहोत. अर्थात यात आपला योग्य आहार, अत्यंत मोलाची भूमिका बनावतो.
कोविड १९ मुळे अशक्तपणा, थकवा, श्वास घेण्याची क्षमता आणि कृतिशीलता कमी होणे अर्थात आपली इच्छाशक्ती आणि सर्व व्यायाम पद्धतशीरपणे हळूहळू वाढवत नेणे हे टप्प्याटप्प्याने करावयाचेच असतात. या व्यायामात बाॅडी सिस्टीम व्यवस्थित कार्यरत रहावीत आणि शरीराची झीज भरून यावी, मनाची उभारी वाढावी आणि आपल्या कामावर परतावे यावर भर दिला जातो. यात हृदय आणि फुप्फुसांची क्षमता, मेंदूची सबलता यात तुमचा तोल आणि समन्वय, स्नायूंची क्षमता यात स्नायू आणि सांधे, मानसिक आणि वैचारिक अशा गोष्टी मोडतात. त्या सहज आत्मसात करता येतात. फक्त तुमची जबरदस्त आत्मशक्ती महत्त्वाची आहे.
१) श्वासाच्या व्यायामावर भर द्यावा . २) श्वास झोपून, मग उभे राहून आणि चालताना स्टेप बाय स्टेप वाढवत न्यावा. ३) जोपर्यंत आत्मविश्वास येत नसेल, तो आपण आपलीच वाढवायचा असतो. त्यात कुणी फार तर मानसिक समुपदेशन करून भीती दूर करून, घरच्या लोकांची साथ, कामावरील लोकांची सहकार्याची भावना यातून फुलत असतो आणि नाॅर्मलाईज होतो. ४) स्नायूंचे आणि सांध्यांचे व्यायाम करावेत. अगदी हळूहळूच वाढवावे. ५) मात्र आरामाच्या स्थितीतही श्वास किंवा धाप लागत नसेल तर सल्ला घ्यावाच. छातीत दुखल्यासारखे वाटते. खूप थकवा वाटला तर चक्क आराम करावा. ६) काही सोपे शरीर संचलनाचे (पी.टी. शाळेतली) व्यायाम करावेत. ७) तरीही त्रास वाढल्यास आपल्या डाॅक्टरी सल्ला घ्यावाच. लक्षात ठेवूया, योग्य काळजी, वेळेत उपचार, योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य आराम यामुळे आपण सर्व जण काेरोनाला हरवूया. कारण वुई लव्ह अवर जिंदगी.