शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

लोटिस्मा वस्तू संग्रहालयाला मिळाला तोफेचा गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 12:19 PM

Chiplun TilakSmarak Ratnagiri- चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने उभारेलेल्या वस्तू संग्रहालयाला नुकताच १ किलो ६८५ ग्रॅम वजनाचा तोफेचा गोळा मिळाला आहे. युनायटेड इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक मुकुंद कानडे यांना त्यांच्या विंध्यवासिनी परिसरातील घराच्या जागेत हा गोळा मिळाला. त्यांनी तो वाचनालयाच्या संग्रहालयाला दिला आहे.

ठळक मुद्देलोटिस्मा वस्तू संग्रहालयाला मिळाला तोफेचा गोळा विंध्यवासिनी परिसरातील घराच्या जागेत सापडला

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने उभारेलेल्या वस्तू संग्रहालयाला नुकताच १ किलो ६८५ ग्रॅम वजनाचा तोफेचा गोळा मिळाला आहे. युनायटेड इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक मुकुंद कानडे यांना त्यांच्या विंध्यवासिनी परिसरातील घराच्या जागेत हा गोळा मिळाला. त्यांनी तो वाचनालयाच्या संग्रहालयाला दिला आहे.लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आपले हे संग्रहालय २४ नोव्हेंबर २०१८ रोजी मूर्तीशास्त्र आणि मंदिरस्थापत्य या विषयातील अधिकारी व्यक्तिमत्त्व डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते पर्यटक, अभ्यासक, जिज्ञासूंसाठी पाहण्यास खुले केले आहे. भगवान परशुराम यांचे वास्तव्यस्थान, क्रोकोडाईल टुरिझमसाठी प्रसिद्ध ऑफबीट डेस्टीनेशन चिपळुणातील हे संग्रहालय कोकणच्या सांस्कृतिक राजधानीचे वैभव आहे. संग्रहालयात चिपळूण परिसरातील अनेक वस्तू पाहायला मिळतात. आता इथल्या युद्धभूमीवरील तोफगोळा मिळाला आहे.विंध्यवासिनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ही इतिहासकाळात युद्धभूमी होती. या चौकात आदिलशाही सरदार शेख बहादूर याला तत्कालिन राजे बारराव कोळी यांनी ठार केले होते. पुढे याच परिसरात आदिलशाही सरदार शिंदे आणि राजे बारराव कोळी यांच्यात मोठी लढाई होऊन कोळ्यांचा पराभव झाला. राजे बारराव कोळी यांचे कोणतेही निशाण पाहण्यात नसले तरी शहरातील वडनाक्यावर असलेली एकवीरा देवी ही यांची कुलदेवता म्हणून स्थापन झालेली होती. मुकुंद कानडे यांनी संग्रहालयाला तोफगोळा भेट दिल्याबद्दल लोटिस्माचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्यवाह धनंजय चितळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.एकमेव संग्रहालयभारतीय मातीतील दोन लाख वर्षांपूर्वीच्या मानवी वापरातील पुराश्मयुगीन हत्यारांपासून कोकणी वापरातील गेल्या दोन-पाचशे वर्षातल्या विविध वस्तूंचा दुर्मीळ ठेवा पाहायला उपलब्ध असलेले पनवेल ते पणजी दरम्यानचे हे एकमेव संग्रहालय आहे. यापूर्वी रामतीर्थ तलाव परिसरात शिवकालीन नाणी मिळाली होती. प्राचीन वस्तूंचे जतन करण्याचे काम संग्रहालयाद्वारे करण्यात येत आहे. या संग्रहालयात नागरिकांनी जुन्या, दुर्मीळ वस्तू देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Tilak Memorialटिळक स्मारकChiplun Nagar Parishadचिपळूण नगरपरिषदRatnagiriरत्नागिरीhistoryइतिहास