चिपळूण : खेड तालुक्यातील लोटे ग्रामपंचायतीने गावातील सुमारे दीड हजार कुटुंबांना विविध वस्तूंचे वाटप केले. तसेच कोरोना कालावधीत आशा स्वयंसेविकांनी मोठे योगदान दिल्याबद्दल लोटे ग्रामपंचायतीतर्फे लोटे पंचक्रोशीतील सुमारे ३० महिलांचा गौरव करण्यात आला.
लोटे ग्रामपंचायतीचे सरपंच चद्रकांत चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली गावात विविध उपक्रम राबविले जात आहेत. लोटे येथे औद्योगिक वसाहतीमुळे लोकांची रहदारी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी ग्रामपंचायतीकडून खबरदारी घेतली जात आहे. पावसाळ्याचे दिवस आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने सॅनिटायझर, हॅण्डवॉश, मास्क, मेडिक्लोअर, साबण आदी वस्तूंचा सेट तयार केला. गावातील भाडेकरूंसह १,३०० कुटुबांना हे साहित्य देण्यात आले. यावेळी सरपंच चंद्रकांत चाळके, उपसरपंच नितीन कडू, संकेत चाळके, मनोहर कालेकर, सचिन काते, जान्हवी शिंदे, समीक्षा जोईल, सुदैवी ठसाळे, नीलिमा चाळके, शीतल ठसाळे, श्वेता काते, ग्रामविकास अधिकारी जी. डी. केदार, कांचन कडू, मनोज जाधव, राजेंद्र हळदे उपस्थित होते.
--------------------------------
खेड तालुक्यातील लाेटे ग्रामपंचायतीतर्फे कुटुंबांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.