ठळक मुद्देकोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणारे मशीन घसरले रत्नागिरी रेल्वेस्थानकची घटना, वाहतूक ठप्प, मशीन ट्रॅकवर आणण्याचे प्रयत्न सुरू
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणारे मशीन रेल्वे ट्रॅकवरून घसरल्याची घटना १२ वाजण्याच्या दरम्याने रत्नागिरी रेल्वे स्थानकानजीकच्या भोके गावाजवळ घडली.कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. या कामासाठी ह्ययुटिव्हीह्ण नावाचं मशीन वापरल जात आहे. हे मशीन नेत असताना रेल्वे ट्रॅकवरून घसरल्याने मुंबईकडून येणाऱ्या आणि मुंबईला जाणाऱ्या गाड्यांना ब्रेक लागला आहे.मशीन घसरल्याने एक तासापासून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. हे मशीन रेल्वे ट्रॅकवर आणण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मशीन रेल्वे ट्रॅकवर आणून लवकरच मार्ग सुरळीत करण्यात येईल असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.