मंडणगड : येथील संतोष अबगुल प्रतिष्ठानतर्फे मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथील कोविड सेंटरला पाणी गरम करणारी मशीन भेट देण्यात आली.
भिंगळोली : येथील ग्रामीण रुग्णालयात कोविडग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांना पिण्यासाठी चाेवीस तास गरम पाण्याची आवश्यकता असते. गरम पाण्याअभावी रुग्णांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने संतोष अबगुल प्रतिष्ठानतर्फे पाणी गरम करण्याचे मशीन रुग्णालयाला भेट देण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिष शिरसे व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थित हे मशीन रुग्णालयाला सुपुर्द करण्यात आले. यावेळी संतोष अबगुल प्रतिष्ठानचे संस्थापक नितीन नटे, नागेश नाकते, महेश पवार, नीलेश रक्ते, तुषार महाडिक, मिलिंद गोरीवले, रुपेश वायकर, सुनील जावळे, शशिकांत फिलसे, प्रवीण सनस, जितेंद्र गावडे उपस्थित होते. डॉ. आशिष शिरसे यांनी प्रतिष्ठानने देणगी रुपाने वस्तू दिल्याने आभार व्यक्त केले.
....................................
भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालयात पाणी गरम करणारे मशीन डॉ. आशिष शिरसे यांना सुपुर्द करताना संतोष अबगुल प्रतिष्ठानचे पदाधिकारी.