रत्नागिरी : जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेचे शिक्षक माधव विश्वनाथ अंकलगे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे सभापती चंद्रकांत मणचेकर यांच्या हस्ते आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांच्या मुख्य उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. एकूण तीन गटांत स्पर्धा घेण्यात आली होती.
स्पर्धेत द्वितीय क्रमांक चित्रा बाजीराव कांबळे (माध्यमिक विद्यालय दाभोळे), तृतीय क्रमांक मनाली मनोहर भुते (कुरतडे क्रमांक १), उत्तेजनार्थ क्रमांक बाबासाहेब लाड (साखरपा क्रमांक १) व संदेश प्रकाश झेपले (देवरूख क्रमांक ४) यांनी मिळविला. या ऑनलाईन कार्यक्रमासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटना, जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे, सचिव संतोष मोहिते, रत्नागिरी तालुकाध्यक्ष संजय तांबे यांच्यासह कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.