शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

स्पर्धक तेच, डावपेचही तेच, पक्ष नवेच; उदय सामंत यांच्याविरोधात उद्धवसेनेची प्रतिष्ठा लागली पणाला

By मनोज मुळ्ये | Published: November 02, 2024 11:21 AM

Maharashtra Assembly Election 2024 : याआधी दाेनवेळा (२००४ आणि २००९) उदय सामंत राष्ट्रवादीत असताना भाजपच्या बाळ माने यांच्याशी विधानसभेचा सामना झाला होता.

Maharashtra Assembly Election 2024 :रत्नागिरी : याआधी तीन निवडणुकांमध्ये ज्यांच्याशी सामना झाला, त्याच बाळ माने यांच्याशी मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात लढत होत आहे. उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना अशा या लढतीत विरोधकांना आपलेसे करुन घेण्याचे जुनेच डावपेच खेळले जाण्याची शक्यता अधिक आहे.

याआधी दाेनवेळा (२००४ आणि २००९) उदय सामंत राष्ट्रवादीत असताना भाजपच्या बाळ माने यांच्याशी विधानसभेचा सामना झाला होता. २०१४ मध्ये उदय सामंत (शिवसेना) आणि बाळ माने (भाजप) असा तिसरा सामना झाला.

तीनहीवेळा सामंत यांचा विजय झाला. यावेळी सामंत शिंदेसेनेत आणि माने उद्धवसेनेत आहेत. उद्धवसेनेसाठी ही लढाई प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे विराेधी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्याकडे घेण्याचे डावपेच सुरू झाले आहेत.

पडद्यामागच्या पक्षांतराला अधिक महत्त्वदोनवेळा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवताना उदय सामंत यांनी विरोधी गटातील लोकांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले होते. यावेळीही उद्धवसेनेतील अनेकजण सामंत यांच्यासोबत जात आहेत. अर्थात पडद्यावरील पक्षांतरापेक्षा पडद्यामागील हालचालींना अधिक महत्त्व आहे.पडद्यामागची पक्षांतरे उद्धवसेनेकडूनही होण्याची शक्यता आहे. भाजपमधील अनेकजण सामंत यांच्याबाजूला उभे असले तरी ते बाळ माने यांची साथ देण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्देगेल्या पाच वर्षात उदय सामंत यांनी भाजपला जवळ न केल्याचा मुद्दा सातत्याने पुढे आणला जात आहे. तो कळीचा ठरणार आहे. उद्धवसेनेमध्ये उमेदवार निवडीवरुन अस्वस्थता आणि नाराजी आहे. पक्षाशी निष्ठा असलेल्या नेत्यांना डावलण्यात आल्याचा मुद्दा गंभीर होत आहे.

लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?लोकसभा निवडणुकीत भाजपचे नारायण राणे विजयी झाले. मात्र रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उद्धवसेनेच्या विनायक राऊत यांना १०,०३७ मताधिक्य मिळाले होते.

२०१९ मध्ये काय घडले ?उदय सामंत (विजयी)    १,१८,४८४सुदेश मयेकर     राष्ट्रवादी                  ३१,१४९दापोदर कांबळे    वंचित बहुजन आघाडी    ४,६२१नोटा    -    ४,५५२

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते      २०१४    उदय सामंत    शिवसेना    ९३,८७६२००९    उदय सामंत     राष्ट्रवादी    ७४,२४५२००४    उदय सामंत    राष्ट्रवादी    ६३,२३३१९९९    बाळ माने    भाजप    ४४,०००

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uday Samantउदय सामंतthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024ratnagiri-acरत्नागिरी