रत्नागिरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी ४ मतदारसंघांत ९ उमेदवारांनी १७ अर्ज दाखल केले आहेत. मात्र, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही.दापोली विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून माजी आमदार संजय कदम आणि महायुतीतून आमदार योगेश कदम यांनी प्रत्येकी १ अर्ज भरला आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून आमदार भास्कर जाधव यांनी २ अर्ज भरले आहेत.
चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतून प्रशांत यादव आणि स्वप्ना प्रशांत यादव यांनी प्रत्येकी ३ अर्ज भरले आहेत. तसेच राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीतून किरण सामंत यांनी ३, महाविकास आघाडीतून राजन साळवी यांनी २ आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड व यशवंत हर्यान यांनी अपक्ष म्हणून प्रत्येकी एक अर्ज भरला आहे.