शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

गुहागरचा आमदार ठरवण्यात भाजपचा मोठा वाटा; नाराजी दूर झाली की नाही याचे कोडे बाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 17:18 IST

गुहागर : उमेदवारीसाठी आग्रही असलेली भाजप गुहागर मतदारसंघात काय भूमिका घेणार, यावर खूप काही ठरणार आहे. येथील जागा शिंदेसेनेला ...

गुहागर : उमेदवारीसाठी आग्रही असलेली भाजप गुहागर मतदारसंघात काय भूमिका घेणार, यावर खूप काही ठरणार आहे. येथील जागा शिंदेसेनेला गेल्यामुळे भाजपने आधीपासूनच नाराजीची झेंडा फडकावला होता. दरम्यान, आजवर पाचवेळा आमदार झालेले भास्कर जाधव सहाव्यांदा जिंकून जिल्ह्यात सर्वाधिकवेळा आमदार होण्याचा विक्रम करणार की, यावेळी त्यांचा रथ महायुती अडवणार, हे पुढील आठवड्यावर ठरेल.अनेक वर्षे गुहागर विधानसभा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व होते. येथे शिवसेनेची ताकदही मोठी आहे. त्यामुळे २००९ पर्यंत बहुतांशवेळा हा मतदारसंघ युतीकडे होता. मात्र २००९ साली मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि येथील राजकीय समीकरणे बिघडली. त्यावर्षी शिवसेनेकडून रामदास कदम आणि भाजपकडून अपक्ष म्हणून विनय नातू यांनी ही निवडणूक लढवली आणि चिपळूणहून गुहागरला गेलेले भास्कर जाधव पहिल्यांदा विजयी झाले. २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन निवडणुका ते विजयी झाले. दोन निवडणुका राष्ट्रवादीकडून तर २०१९ ची निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढवली. २००९ आणि २०१४ मध्ये नातू आणि जाधव आमनेसामने होते. जाधव यांनी नातूंना पराभूत केले.आता महायुतीत भाजपला ही जागा हवी होती. मात्र ती शिंदेसेनेला मिळाली आणि राजेश बेंडल येथे निवडणूक लढवत आहेत. आता नाराजी सोडून भाजपने त्यांच्यासाठी काम केले तर शिंदेसेनेला फायदा आणि काम नाही केले तर भास्कर जाधव यांना फायदा होईल, अशी भाजपची स्थिती आहे. त्यामुळे गुहागरचा आमदार ठरवण्यात भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.भास्कर जाधव यांच्याकडे खूप मोठा अनुभव आहे. मात्र राजेश बेंडल यांचे समाजातील कामही मोठे आहे. आता मतदार कय ठरवतात, हे पुढील आठवड्यात स्पष्ट होईल.

 

  • भास्कर जाधव यांना विजय मिळाला तर ते सहाव्यांदा आमदार होतील आणि जिल्ह्यासाठी तो विक्रम असेल.
  • राजेश बेंडल यांना विधानसभेचा अनुभव नसला तरी कुणी समाजाच्या विकासासाठी त्यांनी खूप काम केले आहे.
  • भाजपची भूमिका हा येथील कळीचा मुद्दा ठरणार आहे.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४guhagar-acगुहागरBhaskar Jadhavभास्कर जाधवShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024