चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रशांत यादव यांना उमेदवारी जाहीर झाली असून, आता चिपळूणमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होणार आहे. यादव यांनी गुरुवारी उमेदवारी अर्जही दाखल केला.सन २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिपळूण मतदारसंघात राष्ट्रवादीचे शेखर निकम विजयी झाले. ते आता अजित पवार यांच्यासोबत आहेत. विद्यमान आमदार असल्याने महायुतीकडून त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून उद्धवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष उत्सुक होते. मात्र महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीनेही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) दिली आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारीसाठी प्रशांत यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यादव यांनी गुरुवारी उमेदवारी अर्जही दाखल केला. आता चिपळूणमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी असा सामना होणार आहे.
चिपळुणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रशांत यादव यांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 1:44 PM