रत्नागिरी : महाविकास आघाडीने केलेल्या आवाहनानुसार महाराष्ट्र बंदमध्ये रत्नागिरीतील व्यापारीही सहभागी झाले आहेत. काही ठिकाणी दुकाने उघडी ठेवणाऱ्यांशी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बाचाबाचीही झाली.
रत्नागिरी शहरातील बाजारपेठेत व इतर ठिकाणी दुकाने बंद होती काही ठिकाणी किरकोळ स्वरुपात दुकाने व खाद्यपदार्थाच्या हातगाड्या उघड्या होत्या. एसटी महामंडळ ने आपली वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू ठेवली आहे लांब पल्ल्याच्या गाड्याही नियोजित वेळेत सोडण्यात आले आहेत ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्या कुठल्याही प्रकारे बंद न करता सोडण्यात येत आहेत तसेच बाहेरून येणाऱ्या गाड्या रत्नागिरी शहरांमध्ये येत आहेत.
रिक्षा वाहतूक काही प्रमाणात चालू आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवेला वगळल्याने दूध, अंडी यांचीही वाहतूक सुरळीत सुरू होती.दुपारी एक नंतर सुरू होतील असे व्यापारी संघाने सांगितले आहे. शिवसेना पदाधिकारी सकाळी शहरात दुकाने बंद करण्याचे आवाहन करत फिरत होते. काही ठिकाणी दुकानदारांनी बंद न करण्याची भूमिका घेतल्याने वादावादीही झाली.