रत्नागिरी : मतमोजणीच्या 17 व्या फेरीनंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी 41 हजार 221 मतांची आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. विधानसभेच्या दोन निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाचा वाटपा काढत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यासमोर भलीभक्कम आघाडी घेतली आहे.रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या 17 फेऱ्या पार पडल्या आहेत. या 17 फेऱ्यांमध्ये एकमेव तिसरी फेरी वगळता प्रत्येक फेरीमध्ये नारायण राणे यांनी जोरदार आघाडी घेतली आहे. त्यातही सावंतवाडी, कुडाळ, कणकवली या तीन मतदारसंघांमध्ये राणे यांना चांगलीच आघाडी मिळाली आहे.रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात त्यांना माफक आघाडीवरच समाधान मानावे लागले आहे. त्याखेरीज चिपळूण आणि राजापूर या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये राणे यांच्याऐवजी विनायक राऊत यांना आघाडी मिळाली आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याने मोठा हात दिल्यामुळे सतराव्या फेरीनंतर नारायण राणे यांनी 41 हजार 221 मतांची आघाडी घेत विजयाकडे घोडदौड सुरू केली आहे.
Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: कोकणात कमळ फुलणार, नारायण राणे यांची विजयाकडे वाटचाल
By मनोज मुळ्ये | Published: June 04, 2024 2:10 PM