रत्नागिरी : शहरानजीकच्या हातखंबा येथील निराधारांचा आधार ठरलेल्या माहेर संस्थेने रत्नागिरीतील एका गरजू, गरीब व हातावर पोट असलेल्या कुटुंबाला एक महिनाभर पुरेल इतक्या अन्नधान्याची मदत केली आहे.
कोरोनाच्या व लॉकडाऊनच्या काळात लोकांना मदतीचे काम चालू ठेवले आहे. रत्नागिरीतील एका गरजू, गरीब व हातावर पोट असलेल्या कुटुंबाला एक महिनाभर पुरेल इतक्या अन्नधान्याची मदत संस्थेने केली. या कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंची यादी तयार करून माहेर संस्थेचे प्रकल्प प्रमुख सुनील कांबळे यांनी जीवनावश्यक वस्तू सुपूर्द केल्या.
कठीण काळात माहेर संस्थेने जीवनावश्यक वस्तूंची मदत केल्याने या कुटुंबाने माहेर संस्थेचे मनापासून आभार मानले.
या बातमीला ४ रोजीच्या शोभना फोल्डरला मोहर नावाने फोटो आहे.
रत्नागिरीतील गरजू कुटुंबाला माहेर संस्थेकडून प्रकल्प प्रमुख सुनील कांबळे यांच्या हस्ते महिनाभराचे अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.