चिपळूण : तालुक्यातील बोरगाव येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकतीच धाड मारून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये रिक्षाचाही समावेश आहे. या प्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हादाखल करण्यात आला आहे. या कारवाईने गावठी दारू धंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत हातभट्टी निर्मुलन कार्यक्रमांतर्गत उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी अवैध दारू धंद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही मोहीम सातत्याने सुरूच राहील, असा इशारा दिला होता. यानुसार ही मोहीम अजूनही सुरूच आहे.बोरगाव येथे हातभट्टी सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार, अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक व चिपळूण कार्यालयाने संयुक्तपणे धाड टाकली. यावेळी गावठी दारू रसायन व दारूच्या कॅनने भरलेली तीन चाकी रिक्षा असा १ लाख ५० हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाईत उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य, सुरेश पाटील, भरारी पथकाचे उपनिरीक्षक किरण पाटील, निखिल पाटील, जवान विशाल विचारे, मिलींद माळी, सागर पवार, निनाद सुर्वे, अतुल वसावे, अर्षद शेख यांनी केली. याप्रकरणी यशवंत हळदणकर व सोमा आग्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोरगाव येथे गावठी दारू धंद्यावर मोठी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 7:49 PM
liquor ban Chiplun Ratnagiri- चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकतीच धाड मारून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये रिक्षाचाही समावेश आहे. या प्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हादाखल करण्यात आला आहे. या कारवाईने गावठी दारू धंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभागाचा पुढाकार रिक्षासह दीड लाखाचा मुद्देमाल केला जप्त