राजेश कांबळे। चिपळूण : एका बाजूला लोकप्रतिनिधी आणि पाटबंधारे खात्याने दाखवलेल्या अनास्थेने चीड निर्माण होत असतानाच दुसऱ्या बाजूला या दुर्घटनेत वाचलेल्या पण घरदार हरवलेल्या लोकांसाठी असंख्य सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. एकीकडे आप्तेष्ट गमावल्याचे दु:ख असताना हा माणुसकीचा ओलावा तिवरेवासियांना धीर देणारा ठरत आहे.धरणफुटीतून वाचलेले, पण घर गमावलेल्या ४७ आपद्ग्रस्तांची व्यवस्था तिवरे येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये करण्यात आली आहे. विविध सामाजिक संस्था, काही दानशूर व्यक्ती त्यांना मदतीचा हात देण्यासाठी आपणहून पुढे येत आहेत.या दुर्घटनेत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन घरातील भांडी, चूल, सिलिंडर, शेगड्या, सर्व सामान वाहून गेले आहे. गेले तीन दिवस तेथील लोकांची चूल पेटलेली नाही. काही सामाजिक संस्थांनी मदत व रिगल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या आपद्ग्रस्तांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. घटना घडल्यापासून तिवरेत पोषण आहार बनविणाऱ्या हर्षदा हरिश्चंद्र शिंदे व विश्वास रामजीराव शिंदे या दोघांनी आपद्ग्रस्तांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. समृध्द कोकण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिध्देश जाधव यांनी ४० टॉवेल, २४ साबण, २४ कोलगेट व काही नऊवारी साड्या, सिध्देश लाड मित्रमंडळ यांच्याकडून टॉवेल, ५० किलो तांदूळ, १० किलो साखर, १० लीटर तेल, रामशेठ रेडीज यांच्याकडून तांदूळ, ४ बिस्कीटचे बॉक्स, तहसीलदार कार्यालयाकडून २८ ब्लँकेट, स्वामी बाळ सत्यधारी महाराज सेवा केंद्र, शीळ-खेडशी (रत्नागिरी), अमित गॅस एजन्सीकडून ३ सिलिंडर, २ शेगड्या, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, जयंत साडी सेंटर यांच्याकडून कपडे, नवशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रीतम देवळेकर या गेल्या तीन दिवसांपासून गावात मदत करताना जेवण व पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यांची ७ ते ८ जणांची टीम याठिकाणी कार्यरत आहे. तिवरे न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक श्रीधर रघुनाथ जोशी हेही आपद्ग्रस्तांना सहकार्य करीत आहेत.
तिवरेवासियांसाठी सरसावले असंख्य हात; घरदार गमावलेल्यांसाठी मदतीचा ओघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 4:31 PM
एका बाजूला लोकप्रतिनिधी आणि पाटबंधारे खात्याने दाखवलेल्या अनास्थेने चीड निर्माण होत असतानाच दुसऱ्या बाजूला या दुर्घटनेत वाचलेल्या पण घरदार हरवलेल्या लोकांसाठी असंख्य सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. एकीकडे आप्तेष्ट गमावल्याचे दु:ख
ठळक मुद्दे- धान्य, कपड्यांची मोठी मदत - असंख्य सामाजिक संस्था पुढे सरसावल्या - मदतीसाठी अनेकजण तिवरेत दाखल