लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : सातबारा उताºयावर नाव टाकण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मंडल अधिकारी प्रदीप राजाराम सावंत (तरवळ) व तलाठी प्रल्हाद ज्ञानोबा पोपलाईन (५८, यश अपार्टमेंट, रत्नागिरी) या दोघांविरोधात गुरुवारी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.याप्रकरणी भैरू अंतू तळेकर यांनी फिर्याद दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हा गुन्हा दाखल केला आहे. ४ मार्च २०१७ ला हा प्रकार घडला होता. तक्रारदार दीपक तळेकर यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारावर नाव नोंद करण्यासाठी प्रदीप सावंत व प्रल्हाद पोपलाईन यांनी शासकीय शुल्काव्यतिरिक्त आठ हजार रुपयांची मागणी केली होती.याबाबत तळेकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सखोल तपासणी केली. त्यातील साक्षीदार तपासले. या तपासणीत आठ हजारपैकी तीन हजार रुपये या दोन्ही आरोपींनी मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.लाच मागितली तरीही गुन्हालाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे आलेल्या तक्रारीनंतर त्यावर विस्तृत शहानिशा करण्यात आली. याच पद्धतीने याआधीही एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ लाच घेताना पकडलेल्याच नाही तर तक्रारीची शहानिशा करून त्यात तथ्य आढळेल, अशा प्रकरणांमध्येही आता लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गुन्हा दाखल करू लागले आहे.
मंडल अधिकारी, तलाठ्याविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 11:32 PM