मंडणगड : रायगड जिल्ह्यातून मंडणगड तालुक्यात खैराची अवैध चोरटी वाहतूक करणारा आयशर ट्रक मंडणगड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलीस निरीक्षक सुशांत वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.पोलीस नाईक अमर मोरे यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. अतिसंरक्षित खैर वृक्षाची तोड तसेच वाहतूक करण्याची परवानगी नसताना संरक्षित वनक्षेत्रातून चोरी करण्यात आली. त्याची साल काढून व शासनाचे शुल्क चुकवून महाड तालुक्यातील तळोशी ते मंडणगड तालुक्यातील दहागाव येथे आयशर ट्रकमधून (एमएच ०४/ एफजे २५४१) ही वाहतूक केली जात होती. गुरुवारी रात्री दुधेरे गावानजीक पोलिसांनी हा ट्रक जप्त केला. त्यामुध्ये ९०८० किलो वजनाचे ५ लाख ४४ हजार ८०० रुपयांचे सोललेले खैराचे लाकूड सापडले.पोलिसांनी या खैर चोरीप्रकरणी महादेव काशिनाथ साळवी, दिनेश प्रकाश गुढेकर (दोन्ही राहणार नांदगाव खुर्द, तालुका महाड), भरत मोरे (तळोशी), पाकळे (दहागाव) या चारजणांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३७९, ३४सह भारतीय वन कायदा १९२७ कलम २६ (१) (अ) (फ), १४ (२) (ख), ४२सह महाराष्ट्र वन नियमावली कलम (८१) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. ट्रक व खैर असा एकूण ७ लाख ४४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल मंडणगड पोलिसांनी जप्त केला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.
मंडणगड अवैध खैर वाहतुकीवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 3:07 PM
forest department Ratnagiri- रायगड जिल्ह्यातून मंडणगड तालुक्यात खैराची अवैध चोरटी वाहतूक करणारा आयशर ट्रक मंडणगड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलीस निरीक्षक सुशांत वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.
ठळक मुद्देमंडणगड अवैध खैर वाहतुकीवर कारवाईचोरटी वाहतूक, आयशर ट्रक मंडणगड पोलिसांचा ताब्यात