लाेकमत न्यूज नेटवर्क
लांजा : लांजा पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेच्या मानसी सिद्धेश्वर आंबेकर यांची सव्वावर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सभापती निवडणुकीची प्रक्रिया पंचायत समिती सभागृहात मंगळवारी पार पडली. प्रभारी सभापती दीपाली दळवी-साळवी यांनी नवनिर्वाचित सभापती मानसी आंबेकर यांना सभापती यांच्या खुर्चीवर बसविले.
मानसी आंबेकर यांनी सभापतीपदाचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी लांजा प्रांताधिकारी पोपट ओमासे यांच्याकडे सादर केला. पंचायत समितीवर शिवसेनेची एकहाती सत्ता असल्याने मानसी आंबेकर यांच्या विरोधात कुणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दुपारी ३ वाजता मानसी आंबेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी आमदार राजन साळवी, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, उपतालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, नगराध्यक्ष मनोहर बाईत, दिलीप पळसुळेदेसाई, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत मणचेकर, स्वरूपा साळवी, पूजा नामये, प्रभारी सभापती दीपाली दळवी-साळवी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.