शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

दिव्यांगांच्या लग्नगाठीने अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:30 PM

सनईचे सूर निनादत असतानाच, करवल्यांची मंडपात एकच घाई झाली होती. एवढ्यात मुहूर्ताची वेळ झाल्यावर मंगलाष्टका सुरू केल्या. अक्षता टाकण्यासाठी नवेट गावातील सहदेव एरीम यांच्या मंडपात सर्व धर्मियातील बंधू-भगिनींची गर्दी केली होती. हा विवाह विशेष होता.

ठळक मुद्देनाते जुळले मनाशी मनाचे मनाची कथा मनाला कळते, मैत्रीचे नाते जेव्हा विवाहात बदलते

अरूण आडिवरेकर/मेहरून नाकाडेरत्नागिरी : सनईचे सूर निनादत असतानाच, करवल्यांची मंडपात एकच घाई झाली होती. एवढ्यात मुहूर्ताची वेळ झाल्यावर मंगलाष्टका सुरू केल्या. अक्षता टाकण्यासाठी नवेट गावातील सहदेव एरीम यांच्या मंडपात सर्व धर्मियातील बंधू-भगिनींची गर्दी केली होती. हा विवाह विशेष होता.

कारण दोन दिव्यांगांची मने जुळून आली होती अन् मैत्रीचं रुपांतर लग्नबंधनात झाले होते. या आनंद सोहळ्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सुवर्णा व योगेश या दोन दिव्यांग उभयतांचं हे लग्न पाहण्यासाठी वºहाडी मंडळींनी गर्दी केली होती.

रत्नागिरी जिल्हा पॅराप्लेजिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष सादीक नाकाडे यांची दोन वर्षांपूर्वी एका मेळाव्यात योगेश खाडे (शिरोळ) या दिव्यांग तरूणाशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. रत्नागिरी जिल्हा पॅराप्लेजिकल फाऊंडेशनचे सदस्यपद योगेशने स्वीकारले होते, तर सुवर्णा एरीम ही संस्थेची पूर्वीपासून सदस्या होती.

पॅराप्लेजिकल संघटनेच्या मेळाव्यासाठी योगेश कोल्हापूरहून रत्नागिरीत आला होता. मेळाव्याचे सूत्रसंचालन सुवर्णाने केले, त्यामुळे मेळाव्यानंतर ओळख झाली. सुवर्णा ही पोलिओग्रस्त आहे तर योगेश पॅराप्लेजिकल आहे. योगेश स्वत: छायाचित्रकार असून, घराजवळच स्टुडिओ आहे.

योगेश व सुवर्णाची पुढे चांगली मैत्री झाली. योगेशने सुवर्णाबरोबर लग्न करायचे असल्याचे सादिकभार्इंना सांगितले. योगेशच्या घरची मंडळी तयार होती, प्रश्न होता सुवर्णाच्या घरच्या मंडळींचा. परंतु दोघांचे विचार जुळले असल्याने शिवाय रितसर खाडे कुटुंबियांकडून मागणी असल्याने एरिम कुटुंबियांनीही परवानगी दिली. सादीकभार्इंच्या पुढाकाराने लग्न ठरले. सुवर्णाच्या घरीच लग्न असल्याने तयारीही जोरदार करण्यात आली होती.शिरोळहून खाडे कुटुंबीय नातेवाईकांसह एक दिवस आधीच नवेट गावी दाखल झाले. शनिवारी साखरपुडा व रविवारी दुपारी ३.१८ मिनिटांनी देवाब्राह्मणाच्या साक्षीने लग्न लागले. व्हिलचेअरवर बसून उभयतांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. दोन धडपड्या जीवांचं शुभमंगल अनेकांना आयुष्यात उभं राहण्याचं धडा देऊन गेलं.नयनी आले आनंदाश्रूसुवर्णा,योगेश या उभयतांना भरभरून आशीर्वाद दिले. रत्नागिरी जिल्हा पॅराप्लेजिकल फाऊंडेशनकडेच यजमानपद असल्याने पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. केवळ उपस्थित न राहिता लग्नाच्या तयारीत त्यांनी हातभारही लावला होता. हा विवाह जुळून येण्यापासून ते तो पार पडेपर्यंत साऱ्याच घटनांना संस्थेचा स्पर्श झाला. मात्र मैत्रीची कहाणी प्रेमात बदलल्याचा आनंद साऱ्यांच्या चेहऱ्यावर तरळला होता.

टॅग्स :marriageलग्नRatnagiriरत्नागिरी