शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

पर्यटनवाढीसाठी मारळनगरीत मार्लेश्वर महोत्सव, लोककलांचे सादरीकरण होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 2:25 PM

महोत्सवात संगमेश्वरी बोली, हार्मोनियम सोलो वादन, जाखडी नृत्य, शाहिरी खडे भजन, वारकरी भजन अशा लोककलांचे सादरीकरण होणार

देवरुख : संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेले श्रीक्षेत्र मार्लेश्वर हे ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ आहे. त्याचा अधिक विकास व्हावा व पर्यटक, भाविक यांचे येणे- जाणे वाढावे, यासाठी आपण पुढाकार घेत आहे. याचाच एक भाग म्हणून १३ व १४ जानेवारीला मारळनगरीत आपण दोन दिवसांचा मार्लेश्वर महोत्सव भरवणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.‘लोककलांचा’ हा महोत्सव असणार आहे.  या महोत्सवाची संकल्पना प्रद्युम्न माने यांची आहे.रवींद्र माने, नेहा माने यांच्या नियोजनात हा महोत्सव रंगणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संगमेश्वर तालुका व मारळ पंचक्रोशीतील शिवसेनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच मानकरी आणि देवनगरी देवरुख क्रांती व्यापारी संघटना यासाठी सहकार्य करणार आहेत.महाेत्सवाचे उद्घाटन १३ रोजी सायंकाळी सात वाजता खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, माजी आमदार सुभाष बने, शिवसेना सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माजी रोहन बने यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने स्थानिकांचे खाद्यपदार्थांचे स्टाॅल लागणार आहेत.मार्लेश्वर परिसरातील सोयी- सुविधा, तसेच धारेश्वर धबधब्याकडे जाण्यासाठी सोयीचा मार्ग, अशा अनेक सुधारणा करण्यासाठी आपण आराखडा तयार केला आहे. शासनाच्या माध्यमातून यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची माहिती रवींद्र माने यांनी दिली.तसेच संगमेश्वर तालुक्यातील पर्यटनस्थळे असलेल्या ठिकाणांची माहिती एलसीडी स्क्रीनद्वारे भाविकांना दाखवण्यात येणार आहे. भाविकांना एकप्रकारे चांगलीच पर्वणी मिळणार आहे.

लोककलांचा समावेशमहोत्सवात संगमेश्वरी बोली, हार्मोनियम सोलो वादन, जाखडी नृत्य, शाहिरी खडे भजन, वारकरी भजन अशा लोककलांचे सादरीकरण होणार आहे. सर्व भाविकांना तालुक्यातील पर्यटनदृष्ट्या माहिती व्हावी, हा मुख्य उद्देश या मार्लेश्वर महोत्सवाचा आहे. मारळनगरीतील पवई येथे प्रथमच अशा प्रकारचा दोन दिवसीय मार्लेश्वर महोत्सव सायंकाळी सात ते अकरा या वेळेत होत असल्याचे माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन