खारवी समाज पतसंस्थेची सभा
रत्नागिरी : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेची जिल्ह्याची तिसरी अधिमंडळ वार्षिक बैठक रविवार दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. सर्व सभासदांनी सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय शांतता दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रा. मयुरेश राणे, प्रा. धनजंय दळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्मृतिदिनानिमित्त स्पर्धा
रत्नागिरी : येथील (कै) नाना गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा विजू नाटेकर (कला), विजयालक्ष्मी गांधी (वाणिज्य), रमेश कीर (विज्ञान) कनिष्ठ महाविद्यालयासाठी मर्यादित आहे. निबंध मराठीतून लिहणे आवश्यक आहे. एक हजार शब्दमर्यादेची अट ठेवण्यात आली आहे.
तिरंगी भजनाचा सामना
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा भजन मंडळातर्फे कोकणातील तीन जिल्ह्यांतील भजनी कलाकारांचा तिरंगी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला होता. नरेश भेर्लेबुवा (रायगड), गणेश जांभळेबुवा (रत्नागिरी), चंद्रकांत जाधवबुवा (सिंधुदुर्ग) यांच्यात सामना रंगला. काशीविश्वेश्वर येथे या सामन्याचे आयाेजन करण्यात आले हाेते.