मंडणगड : ग्रामसंवाद सरपंच समूह मंडणगड यांच्या वतीने येथील पंचायत समिती सभागृहात सरपंच ग्रामसंवाद आयोजित करण्यात आला होता. या वेळी मंडणगड तालुक्यातील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तसेच ग्रामपंचायतीतर्फे करण्यात येणारी विकासकामे, सरपंचांचे मानधन आदी विषयांवर चर्चा झाली.
काम वाटप समितीची बैठक
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या वतीने गुरुवारी तालुकास्तरावर काम वाटप समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या श्यामरावजी पेजे सभागृहात मंगळवारी मजूर सहकारी संस्थेची बैठक आयोजित केली होती. काम वाटप समितीच्या बैठकीत पाच लाख रुपयांच्या आतील कामांचे वाटप होणार आहे.
असोसिएशनतर्फे मदत
रत्नागिरी : चिपळूण येथील महापुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रत्नागिरी जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन धावून आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या आवाहनानुसार असोसिएशनने चिपळूण येथे जाऊन पूरग्रस्तांना मोफत वैद्यकीय सेवा, औषधे आदींची मदत केली.
पूरग्रस्तांना मदत
खेड : शिवसेनेचे गोरेगाव विधानसभा संघटक दिलीप शिंदे व प्रमिला शिंदे यांच्या योगदानाने खेड आणि चिपळूणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्य तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या मदतीचे वितरण आमदार योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध भागांत करण्यात आले.
पावसाची विश्रांती
रत्नागिरी : गेल्या चार दिवसांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. सध्या कडाक्याचे ऊन पडू लागले आहे. त्यामुळे उन्हाच्या कडाक्याने उकाड्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. अचानक वातावरण बदलले असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ लागला असून, आजार वाढले आहेत.