शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
4
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
5
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
6
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
7
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
8
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
9
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
10
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
11
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
12
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
13
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
14
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
15
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
16
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
17
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
18
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
19
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
20
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

कोकण मार्गावर येत्या शुक्रवारी मेगाब्लॉक, रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार 

By अरुण आडिवरेकर | Published: July 03, 2023 6:35 PM

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी ७ जुलै रोजी दुपारी १२:२० वाजल्यापासून ...

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी ७ जुलै रोजी दुपारी १२:२० वाजल्यापासून ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे ४ रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कोकण मार्गावर मालमत्ता देखभालीचे काम हाती घेण्यात येत आहे. वीर ते खेड विभागादरम्यान दुपारी १२:२० वाजता सुरू होणारा मेगाब्लॉक दुपारी ३:२० वाजता संपणार आहे. या मेगाब्लॉकमुळे ६ जुलै रोजी सुटणारी २०९१० क्रमांकाची पोरबंदर कोच्युवेली एक्स्प्रेस रोहा-वीर विभागादरम्यान १ तास ५० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. तसेच ६ जुलै रोजी सुटणारी १२४३२ क्रमांकाची तिरुअनंतरपुरम-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस रत्नागिरी-खेड विभागादरम्यान ३० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.७ जुलै रोजी सुटणारी १६३४५ क्रमांकाची तिरुअनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेसही रोहा-वीर विभागात ३५ मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वे