रत्नागिरी : गणेशोत्सवात चिपळुणात येणाऱ्या गणेशभक्तांच्या साेयीसाठी विशेष गाडी साेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवा ते चिपळूण मार्गावर दिनांक १३ सप्टेंबर पासून ३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येणार आहे. पूर्णपणे अनारक्षित असलेल्या या गाडीमुळे मुंबईहून गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या गाडीच्या एकूण ३६ फेऱ्या होणार आहेत.गणेशाेत्सवात काेकणात येणाऱ्या मुंबईकरांची संख्या अधिक आहे. या कालावधीत काेकण रेल्वे मार्गावर साेडण्यात येणाऱ्या विशेष गाड्या हाऊसफुल हाेऊन धावतात. त्यामुळे गणेशाेत्सवात गावी येणाऱ्या मुंबईकरांचे हाल हाेतात. त्यातही चिपळूणसाठी विशेष गाडी नसल्याने या भागातील प्रवाशांना गर्दीतूनच प्रवास करावा लागताे. त्यामुळे यावर्षी मेमू स्पेशल गाडी साेडण्याचा निर्णय घेतला आहे.ही गाडी येथे थांबणारदिवा-चिपळूण मेमू स्पेशल गाडी पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड तसेच अंजनी या स्थानकावर थांबणार आहे.
चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवात चिपळूणपर्यंत धावणार मेमू स्पेशल
By अरुण आडिवरेकर | Published: July 01, 2023 6:26 PM