लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये बाजारपेठ बंद असतानाच येथील व्यापाऱ्यांनी संघटित होऊन शहर व्यापारी महासंघटनेची शुक्रवारी स्थापना केली. या संघटनेची कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी माजी नगरसेवक शिरीष काटकर यांची निवड करण्यात आली.
या संघटनेच्या कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी किशोर रेडीज, उपाध्यक्ष शैलेश टाकळे, पारस ओसवाल, लियाकत शहा, सूर्यकांत चिपळूणकर, मीनल आंब्रे, सरचिटणीस उदय ओतारी, सहचिटणीस सौरभ मिर्लेकर, खजिनदार शैलेश सावंत, तर सदस्य म्हणून अरुण भोजने, वासुदेव भांबुरे, नितीन मिर्लेकर, भूषण ओसवाल, रोहन चौधरी, शिरीष मुळे, दिलीप हरवंदे, संजय जाधव, बाबू चिखले, सचिन शेठ, मंदार काणे, इम्रान खतीब, अरुण इंगवले, मधुर कदम, राजन कोकाटे, दीपक निमकर, बिलाल पालकर, पांडुरंग फडतरे, प्रशांत रेळेकर, सल्लागार सुधीर शिंदे, श्रीराम रेडीज यांची निवड केली आहे.