रत्नागिरी : जिल्ह्यात दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. मात्र बुधवारी रत्नागिरीत पावसाऐवजी उष्म्यामध्ये वाढ झाली आहे. किमान तापमान २६ अंशापर्यंत वाढल्यामुळे सकाळपासून उकाडा वाढला आहे.गेल्या काही दिवसात उष्मा वाढला आहे. रत्नागिरीत ३२ ते ३४ अंश इतके कमाल तापमान नोंदले जात आहे. इतरवेळी साधारण २२ ते २३ अंशावर राहणारे किमान तापमान बुधवारी २६ अंशावर पोहोचले. त्यामुळे उष्म्याचे प्रमाण सकाळपासूनच अधिक जाणवत आहे.सर्वसाधारणपणे पावसाआधी उष्म्याचे प्रमाण वाढते. तशी स्थिती दुपारपर्यंत निर्माण झाली आहे. मात्र पावसाची शक्यता दिसत नाही.दोन दिवस पावसाची शक्यताकोकणात १५ ते १६ मार्च या कालावधीत काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात या दोन दिवसांच्या कालावधीत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाचा पावसाचा इशारा; मात्र, रत्नागिरीत वाढला उष्मा
By मनोज मुळ्ये | Published: March 15, 2023 1:26 PM