शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
2
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
3
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
4
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
5
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
6
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
7
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
9
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
10
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
11
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
13
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
14
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
15
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
16
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
17
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
19
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?

मनाची कथा मनाला कळते, मैत्रीचे नाते जेव्हा विवाहात बदलते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:47 PM

अरूण आडिवरेकर/मेहरून नाकाडे। लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : सनईचे सूर निनादत असतानाच, करवल्यांची मंडपात एकच घाई झाली होती. एवढ्यात ...

अरूण आडिवरेकर/मेहरून नाकाडे।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : सनईचे सूर निनादत असतानाच, करवल्यांची मंडपात एकच घाई झाली होती. एवढ्यात मुहूर्ताची वेळ झाल्यावर मंगलाष्टका सुरू केल्या. अक्षता टाकण्यासाठी नवेट गावातील सहदेव एरीम यांच्या मंडपात सर्व धर्मियातील बंधू-भगिनींची गर्दी केली होती. हा विवाह विशेष होता. कारण दोन दिव्यांगांची मने जुळून आली होती अन् मैत्रीचं रुपांतर लग्नबंधनात झाले होते. या आनंद सोहळ्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सुवर्णा व योगेश या दोन दिव्यांग उभयतांचं हे लग्न पाहण्यासाठी वºहाडी मंडळींनी गर्दी केली होती.रत्नागिरी जिल्हा पॅराप्लेजिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष सादीक नाकाडे यांची दोन वर्षांपूर्वी एका मेळाव्यात योगेश खाडे (शिरोळ) या दिव्यांग तरूणाशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. रत्नागिरी जिल्हा पॅराप्लेजिकल फाऊंडेशनचे सदस्यपद योगेशने स्वीकारले होते, तर सुवर्णा एरीम ही संस्थेची पूर्वीपासून सदस्या होती. पॅराप्लेजिकल संघटनेच्या मेळाव्यासाठी योगेश कोल्हापूरहून रत्नागिरीत आला होता. मेळाव्याचे सूत्रसंचालन सुवर्णाने केले, त्यामुळे मेळाव्यानंतर ओळख झाली. सुवर्णा ही पोलिओग्रस्त आहे तर योगेश पॅराप्लेजिकल आहे. योगेश स्वत: छायाचित्रकार असून, घराजवळच स्टुडिओ आहे. योगेश व सुवर्णाची पुढे चांगली मैत्री झाली. योगेशने सुवर्णाबरोबर लग्न करायचे असल्याचे सादिकभार्इंना सांगितले. योगेशच्या घरची मंडळी तयार होती, प्रश्न होता सुवर्णाच्या घरच्या मंडळींचा. परंतु दोघांचे विचार जुळले असल्याने शिवाय रितसर खाडे कुटुंबियांकडून मागणी असल्याने एरिम कुटुंबियांनीही परवानगी दिली. सादीकभार्इंच्या पुढाकाराने लग्न ठरले. सुवर्णाच्या घरीच लग्न असल्याने तयारीही जोरदार करण्यात आली होती.शिरोळहून खाडे कुटुंबीय नातेवाईकांसह एक दिवस आधीच नवेट गावी दाखल झाले. शनिवारी साखरपुडा व रविवारी दुपारी ३.१८ मिनिटांनी देवाब्राह्मणाच्या साक्षीने लग्न लागले. व्हिलचेअरवर बसून उभयतांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. दोन धडपड्या जीवांचं शुभमंगल अनेकांना आयुष्यात उभं राहण्याचं धडा देऊन गेलं.नयनी आले आनंदाश्रूसुवर्णा,योगेश या उभयतांना भरभरून आशीर्वाद दिले. रत्नागिरी जिल्हा पॅराप्लेजिकल फाऊंडेशनकडेच यजमानपद असल्याने पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. केवळ उपस्थित न राहिता लग्नाच्या तयारीत त्यांनी हातभारही लावला होता. हा विवाह जुळून येण्यापासून ते तो पार पडेपर्यंत साऱ्याच घटनांना संस्थेचा स्पर्श झाला. मात्र मैत्रीची कहाणी प्रेमात बदलल्याचा आनंद साऱ्यांच्या चेहºयावर तरळला होता.