शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

'मातोश्री'कडून आमदार भास्कर जाधवांवर सोपवली मोठी जबाबदारी

By संदीप बांद्रे | Published: June 09, 2024 5:38 PM

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांच्याकडे सर्व प्रथम प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली होती.

चिपळूण : लोकसभा निवडणूकीत पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण ताकदीने पूर्ण करून अपेक्षित यश मिळवून दिल्यानंतर "मातोश्री"चा आमदार भास्करराव जाधव यांच्यावरील विश्वास अधिक वाढला असून त्यांना पक्षाने आता पुन्हा त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. पूर्व विदर्भ तसेच सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या विभागीय नेते पदी आमदार भास्कर जाधव यांची नियुक्ती उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांच्याकडे सर्व प्रथम प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली होती. काही काळानंतर त्यांना पक्षाचे उप नेते पद देण्यात आले. या पदावर देखील त्यांनी उत्तम काम केले. त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांचा आमदार जाधवावरील विश्वास वाढला. विधानसभा सभागृहातील कामकाजात लक्ष घालत  जाधव यांनी सभागृह अक्षरशः गाजवले. विधानसभेच्या अध्यक्ष पदावर तर त्यांनी ऐतिहासिक असे काम करून दाखवले होते.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार जाधव पूर्ण ताकदीने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे राहिले. होऊदे चर्चा, जन संवाद अशा पक्षीय कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण राज्यात पक्षाची बाजू भक्कमपणे मांडताना विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. त्याची दखल घेत पक्षाने त्यांना थेट शिवसेना नेते पदाची जबादारी दिली. तसेच लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी देण्यात आली होती.

पूर्व विदर्भात देखील त्यांनी पूर्ण ताकदीने काम केले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत असे यश मिळवून दिले. त्यामुळे आमदार जाधव यांच्यावर दिलेली जबाबदारी ते ताकदीने व प्रामाणिकपणे पूर्ण करतात असा  पक्षप्रमुखांचा अधिक विश्वास संपादन करण्यात जाधव यशस्वी झाल्याचे आता स्पष्टपणे समोर येत आहे. त्यामुळेच आता त्यांच्याकडे पूर्व विदर्भासह सातारा,सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचे विभागीय नेते पद देण्यात आले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या मुखपत्रातून तसे जाहीर करण्यात आले आहे.

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेChiplunचिपळुण