असगोली : गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे संस्थापक राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, चिखली व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
गुहागर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, चिखली येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकला वाडकर, मनसेचे गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर, माजी अध्यक्ष राजेश शेटे, महिला अध्यक्ष सानिया ठाकूर, महिला विभाग अध्यक्ष व तळवली ग्रामपंचायतीच्या सरपंच मयुरी शिगवण, जानवले ग्रामपंचायतीच्या सदस्या वैभवी जानवलकर, तेजस पोकळे, संजय भुवड, गंगाराम खांबे, दिनेश निवाते, रुपेश घवाले आदी कार्यकर्त्यांसह सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. वाडकर यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्यसेवक विजय जानवलकर, कमलेश लाकडे, आरोग्य पर्यवेक्षक समीर पुरोहित, मनोज सकपाळ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अजित पाटील, आरोग्यसेविका शीतल किल्लेकर, वाहन चालक सचिन शिर्के, सफाई कर्मचारी संतोष शिगवण, डाटा ऑपरेटर अजय कणगे, बेंद्रे, आरोग्यसेवक व्ही. वाय. विलणकर, एस. एस. अलीम, आरोग्यसेविका पी. ई. कदम, धवत, एन. यू. शिंगणे, के. ए. जाधव, पी. एस. पपुलवार, आशा गट प्रवर्तक सुरभी भोसले, नेहा वराडकर आदींनाही सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. वाडकर यांनी मनोगत व्यक्त केले.
गुहागर ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचाही मनसेकडून कोविड योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. बळवंत यांनी मनोगत व्यक्त केले. चिखली येथील श्री काडसिध्देश्वर मठात जाऊन राजसाहेब ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो, यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली.