शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
2
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
3
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
4
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
5
आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे योग, यश-कीर्ती; चांगल्या बातम्या मिळतील, शुभ दिवस
6
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
7
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
8
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
9
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
10
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
11
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
12
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
13
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
14
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
15
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
16
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
17
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
18
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
19
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
20
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!

मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकरांना जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 12:07 PM

मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळेच हा धमकीचा फोन आल्याचा आरोप वैभव खेडेकर यांनी केला आहे.

खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकर यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळेच हा धमकीचा फोन आल्याचा आरोप वैभव खेडेकर यांनी केला आहे. धमकी देणारा फोन हा परदेशातील क्रमांकावरून आल्याचं खेडेकर यांनी सांगितलं.याबाबत ते खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप खेडेकर यांनी केला आहे. खेडेकर यांनी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोकणात महाआरती आणि मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळेच धमकी देणारा फोन आल्याच त्यांचे म्हणणे आहे.वैभव खेडेकर हे मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस आहेत. यापूर्वी अनेक वेळा वैभव खेडेकर हे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आले आहेत. एखाद आक्रमक आंदोलन किंवा एखाद्या अधिकाऱ्याला मनसे स्टाइलने दिलेला झटका यामुळे ते कायम चर्चेत असतात.मनसेचे पहिले नगराध्यक्षखेडेकर हे खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष होते. मनसेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून त्यांची नोंद आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एप्रिल महिन्यात खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे. नगराध्यक्ष पदावर असताना नियमबाह्य काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.नियमबाह्य पद्धतीने देयके प्रदान करणं, मान्यता नसतानाही खासगी वाहनात सरकारी खर्चाने इंधन भरणे, इतिवृत्तांत बदल करणे असे अनेक आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. अखेर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वैभव खेडेकर यांना नगराध्यक्ष पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMNSमनसेMosqueमशिदCrime Newsगुन्हेगारी