शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्रासोबत १३ राज्यांमध्ये पोटनिवडणुका लागणार; लोकसभेच्या तीन रिक्त जागा, पैकी एक राज्यातील
2
अब्दुल सत्तारांची भाजपावर कुरघोडी; फुलंब्रीमधून समर्थकाची उमेदवारी केली जाहीर
3
७ आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; ठाकरे गटाच्या याचिकेवर निकाल देण्यास कोर्टाचा नकार
4
"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप
5
काय आहे PM इंटर्नशिप योजना?, १.५५ लाखाहून अधिक अर्ज; दरमहिना मिळणार ५ हजार रुपये
6
निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजपानं सोडवला मोठा तिढा? महायुतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
7
८० वर्षांनी संकष्टी चतुर्थीला ५ राजयोग: १० राशींना लाभ, धनलक्ष्मी कृपा; अपार यश, शुभच होईल!
8
Swami Samartha: विकत किंवा भेट मिळालेली स्वामींची मूर्ती घरी स्थापन कशी करावी? वाचा नियम!
9
पाकिस्तानसह 'भारत'ही हरला! न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये; टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर
10
न्यूझीलंड विरूद्ध उद्यापासून टीम इंडियाची 'कसोटी'; विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडण्याची रोहित शर्माला संधी
11
Munawar Faruqui : आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती
12
Hyundai Motor India IPO : ह्युंदाईचा आयपीओ उघडताच ८% सबस्क्राइब, पण ग्रे मार्केटमध्ये ९२ टक्क्यांपर्यंत घसरण
13
नेत्यांची उडाली झोप! बँकेच्या क्लर्कने काढले सर्वांचे अकाउंट डिटेल्स, पंतप्रधानांसह अनेकांना धक्का 
14
'रंगभूमीचं मोठं नुकसान...', अतुल परचुरेंच्या निधनानंतर वंदना गुप्ते भावुक; शेअर केला फोटो
15
Baba Siddique : धक्कादायक! गुरमेल आणि झिशानची जेलमध्ये भेट; १० महिने एकत्र राहिले, चांगली मैत्री झाली अन्...
16
'फुलवंती' वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया आली का? प्राजक्ता म्हणाली, "हा माझा स्वभाव नाही की मी..."
17
शिक्षण क्षेत्रातील आधारवड हरपला, माजी प्र-कुलगुरू अशोक प्रधान यांचे निधन 
18
निज्जर हत्याकांडात अमित शाह यांचे नाव? कॅनडाची अजित डोवालांसोबत सिक्रेट मिटिंग, दाव्याने खळबळ
19
Medicine Price Hike: जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी
20
मी पुन्हा येईन... कर्मचाऱ्याने असा काही राजीनामा दिला की, होईल २०१९ च्या निवडणुकीची आठवण

तुमच्या जमिनींचा व्यापार होतोय, जागे राहा; राज ठाकरे यांनी टोचले कोकणवासीयांचे कान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2023 10:55 PM

ते कवडीमोलाने तुमच्या जमिनी घेतात आणि हजारपट दराने विकतात. तुम्हाला कळतच नाही का? राज ठाकरेंचा सवाल

रत्नागिरी : तुमचे लोकप्रतिनिधी व्यापारी आहेत. कोकणात कोणत्या भागात प्रकल्प येणार आहे, हे त्यांना माहिती असते. ते कवडीमोलाने तुमच्या जमिनी घेतात आणि हजारपट दराने विकतात. तुम्हाला कळतच नाही का ? अशा कोणालाही जमिनी विकू नका, जागे राहा, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणवासीयांचे कान टोचले.

रत्नागिरीतील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे शनिवारी (६ मे) झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी कोकण विकासाच्या मुद्द्यावरून सध्याच्या आणि आधीच्या सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले. पर्यटन, कोकणातील गडकिल्ले, कोकणात येणारे उद्योग आणि त्याच्या जमिनींच्या व्यवहारातील घोटाळा या साऱ्यांवर राज यांनी आपल्या ‘ठाकरी’ शैलीत सणसणीत प्रहार केले.४० मिनिटांच्या मोजक्या, पण थेट भाषणात ठाकरे यांनी सुरुवातीलाच जमिनींच्या विक्रीबाबत कोकणी माणसाचे कान टोचले. याआधी एन्रॉन, अणुऊर्जा यांसारखे प्रकल्प येण्याआधीच कोकणी लोकांनी व्यापाऱ्यांना आपल्या जागा विकल्या. आता नाणार, बारसूबाबतही तेच होत आहे. जमिनी पायाखालून जात आहेत, तरीही कोकणी माणसाला कळत कसे नाही, असा थेट प्रश्नच त्यांनी केला. इथले लोकप्रतिनिधी व्यापारी आहेत आणि लोकांच्या जमिनींचे मोठमोठे व्यवहार करत आहेत. हेच कोकणी माणसाशी बोलण्यासाठी आपण आलो असल्याचे ते म्हणाले.

प्रकल्पांबाबत बोलताना ते म्हणाले की, नाणारमध्ये होणारा प्रकल्प अचानक बारसूत कसा गेला ? कुठून आले हे नाव ? या बारसूमध्ये कातळशिल्पे आहेत, जी युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होत आहेत. अंतिम यादीत या कातळशिल्पांचे नाव आल्यानंतर आसपासच्या तीन किलोमीटर परिसरात कसलेही बांधकाम करता येणार नाही. मग तिथे प्रकल्प कसा होणार ? लोकांना सतत अंधारात ठेवले जात आहे. म्हणूनच जमिनी विकू नका, काेकण वाचवा, अशी विनंती त्यांनी हात जोडून केली. पर्यटनाच्या क्षेत्रात कोकणात इतकी उपलब्धता आहे की, कोकण राज्याला पोसू शकतो. मात्र, त्याकडे राज्य सरकारने लक्ष द्यायला हवे, असे ते म्हणाले.

पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्षउद्धव ठाकरे यांचे नाव न घेता राज ठाकरे यांनी त्यांना टोला हाणला. पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज येऊन गेले. म्हणाले, लोकांची भावना असेल तीच आमची भावना. म्हणजे काय ? बाळासाहेबांचे नाव घेऊन महापौरांचा बंगला ढापताना लोकांना त्यांची भावना विचारली होती का, असा थेट प्रश्नच राज ठाकरे यांनी विचारला. जनतेचे हित कशात आहे, हे बघण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. पण, तेच म्हणतात, लोकांची भावना तीच आमची भावना. अशाने विकास कसा होणार, असा प्रश्नही त्यांनी केला.

पवार यांच्यावरही कडाडून टीका

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला मी विरोध करत असल्याचे शरद पवार यांनी पसरवले. मात्र या पवार यांनी आजपर्यंत एकदाही आपल्या भाषणात शिवछत्रपतींचे नाव घेतलेले नाही. आपला विरोध शिवछत्रपतींच्या स्मारकाला असूच शकत नाही. पण पुढच्या पिढीला इतिहास कळायला हवा असेल तर आधी महाराजांचे गडकिल्ले चांगले ठेवा, ती खरी स्मारक आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेRatnagiriरत्नागिरी