चिपळूण : महागाईविरोधात घोषणा देत आठ बैलगाड्या, हातगाडीवर पेटविलेली चूल आणि लाकडाची मोळी घेतलेले ग्रामस्थ अशा थाटात चिपळूण काँग्रेसने निषेध मोर्चा काढला.केंद्र सरकारला महागाई आटोक्यात आणण्यात अपयश आले आहे. या विरोधात गुरुवारी रत्नागिरी जिल्हा प्रभारी मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय भोसले, माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे, शहराध्यक्ष लियाकत शाह, उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे उपस्थित होते.निषेधाची जोरदार घोषणाबाजी करीत हा मोर्चा भाजी मंडईमधून निघाला. बाजारपेठमार्ग येथून इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ते पंचायत समिती येथून प्रांत कार्यालय या ठिकाणी आला. या निषेध मोर्चाने साऱ्या चिपळूणकरांचे लक्ष वेधून घेतले. तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, सेवादल महिला जिल्हाध्यक्ष नीलम शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार थरवल, नगरसेवक कबीर कादरी, करामत मिठागरी, नगरसेवक सफा गोठे, संजीवनी शिंदे यांच्यासह चिपळूणमधील अनेन नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.बैलगाड्या ठरल्या आकर्षणमोर्चात आठ बैलगाड्या आणण्यात आल्या होत्या. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर याचा निषेध म्हणून या बैलगाडी आणून अनोखा निषेध करण्यात आला, तर हातगाडीवर चूल पेटविण्यात आली होती. गॅस दरवाढ प्रचंड झाली आहे. त्यामुळे आता चुलीवरच सारे अवलंबून असल्याने या मोर्चात डोक्यावर मोळी घेतलेले ग्रामस्थ सहभागी झाले होते.
महागाईविरोधात चिपळूणमध्ये मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 12:28 PM
congress morcha Chiplun Ratnagiri- महागाईविरोधात घोषणा देत आठ बैलगाड्या, हातगाडीवर पेटविलेली चूल आणि लाकडाची मोळी घेतलेले ग्रामस्थ अशा थाटात चिपळूण काँग्रेसने निषेध मोर्चा काढला.
ठळक मुद्देमहागाई आटोक्यात आणण्यात अपयश निषेधाची जोरदार घोषणाबाजी