रत्नागिरी : रत्नागिरी शहर आणि परिसरात शुक्रवारी सायंकाळनंतर मान्सूनच्या पहिल्याच विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. अवघ्या दोन तासाच्या कालावधीत रत्नागिरी तालुक्यात २३७ मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले होते.नैऋत्य मोसमी पावसाचे रत्नागिरी जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस रत्नागिरी तालुक्यात २३७ मिलिमीटर नोंदला गेला. पावसामुळे शहरातील सर्वच भागात रस्त्यावर पाणी आले होते. अनेकांच्या गाड्या पाण्यात बुडाल्या होत्या. शहरातील गटारे साफ न केल्याने गटाराचेही पाणी रस्त्यावर आल्याने घाणीचे साम्राज्य पसरले होते.रत्नागिरी तालुक्याखालोखाल राजापूर तालुक्यात १६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात १२, दापोली ३३, खेड ९, गुहागर ५८, चिपळूण ३३ संगमेश्वर २८, रत्नागिरी २३७, लांजा ५९ आणि राजापूर तालुक्यात १६० मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे.
रत्नागिरी तालुक्यात अवघ्या २ तासात ९ इंचापेक्षा अधिक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 11:57 AM
रत्नागिरी : रत्नागिरी शहर आणि परिसरात शुक्रवारी सायंकाळनंतर मान्सूनच्या पहिल्याच विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. अवघ्या दोन तासाच्या कालावधीत ...
ठळक मुद्देविक्रमी पावसाची नोंद, शहरातील अनेक भागात पाणी रत्नागिरीनंतर राजापुरात पावसाची नोंद