शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
5
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
6
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
7
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
8
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
9
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
10
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
11
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
12
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
13
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
14
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
15
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
16
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
17
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
18
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
19
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
20
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण

चिपळुणात इच्छुकांची साठमारी, युती, आघाडीत उमेदवार भारी; आमदार शेखर निकम यांच्यासमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 5:18 PM

चिपळूण : चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात आतापासूनच इच्छुकांची साठमारी सुरु झाली आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांकडून ...

चिपळूण : चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात आतापासूनच इच्छुकांची साठमारी सुरु झाली आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांकडून तसेच महाविकास आघाडीकडून ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांकडून इच्छुक पुढे येत आहेत. त्यामुळे या जागेसाठी पक्षनिश्चिती आणि उमेदवाराची निवड या दोन्ही गोष्टी राजकीय पक्षांसाठी डोकेदुखीच्या होणार आहेत.बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आता चढाओढ लागली आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार शेखर निकम आणि शिवसेनेचे सदानंद चव्हाण २०२४ च्या निवडणूक रिंगणात उतरण्यास उत्सुक आहेत. त्याचवेळी महाविकास आघाडीकडून नुकतेच काँग्रेसमधून राष्ट्रवादीत (शरद पवार गट) गेलेले प्रशांत यादव, ठाकरे शिवसेनेकडून भास्कर जाधव आणि रोहन बने इच्छुक आहेत. दरम्यान, प्रशांत यादव राष्ट्रवादीत गेल्यानंतर आता काँग्रेस आक्रमक झाली असून, ही जागा काँग्रेस लढवेल, असे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जाहीरही केले आहे.

शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे शेखर निकम यांनी दमदार विजय मिळवला. अनेक वर्षानंतर हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे खेचून आणला. त्यामुळे येथे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण झाले होते. परंतु राज्यातील बदलत्या समीकरणांमुळे राष्ट्रवादीत फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादीच्या गटाने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये आमदार शेखर निकम हेही त्यांच्या सोबत गेले. त्यामुळे स्थानिक पातळीवरही राष्ट्रवादीत फूट पडली. माजी आमदार रमेश कदम यांनी शरद पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेत पुन्हा पक्ष बांधणीला सुरुवात केली. त्यांनी अनेक नवीन चेहऱ्यांना पदे देऊन नव्या दमाने सुरुवात केली आहे.आघाडीत इच्छुक अधिक

  • महाविकास आघाडीत चिपळूण मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. आता शेखर निकम महायुतीमध्ये सामील झाल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कोण निवडणूक लढवणार, हा प्रश्न होता.
  • येथे उमेदवार नसल्याने हा मतदार संघ ठाकरे गटाला देऊन त्या बदल्यात जिल्ह्यातील एखादा मतदारसंघ शरद पावर आपल्याकडे घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
  • विशेष म्हणजे ठाकरे शिवसेनेही या मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी या मतदार संघात आपण इच्छुक असल्याचे जाहीर करत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता.
  • त्याचवेळी माजी आमदार सुभाष बने यांचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनीही तयारी सुरू केली होती. त्यामुळे हा मतदार संघ ठाकरे शिवसेनेकडे जाणार असे स्पष्ट चित्र दिसू लागले होते.
  • आता प्रशांत यादव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे आणि ते उमेदवार असतील असे त्यांच्या पक्षप्रवेशाच्यावेळीच जाहीर झाल्याने महाविआस आघाडीकडून या मतदार संघात निवडणूक कोण लढवणार, हा प्रश्नच आहे.

महायुतीकडून कोणज्यावेळी शिवसेनेत फूट पडली तेव्हा चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत नव्हता. त्यामुळे चिपळूणची जागा सदानंद चव्हाण यांना मिळेल, असे अपेक्षित धरले जात होते. मात्र नंतरच्या घडामाेडींमध्ये विद्यमान आमदार शेखर निकम महायुतीत सामील झाल्यामुळे महायुतीकडून येथे निकम की चव्हाण असा प्रश्न आहे.

काँग्रेसनेही बांधले बाशिंगकाँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेस दुखावली गेली आहे. आता आम्हीही येथे उमेदवार उभा करणार, असा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना ही निवडणूक लढवायची असल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणElectionनिवडणूकPoliticsराजकारण