मेहरून नाकाडेरत्नागिरी : पालकांची कोरोनाबद्दलची भीती कमी झाल्याने शाळा सुरू होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, शाळेतील विद्यार्थी उपस्थिती पन्नास टक्केच आहे. जिल्ह्यातील ४५४पैकी ४०८ शाळा सुरू झाल्या आहेत. एकूण ८२ हजार ६९ विद्यार्थी संख्येपैकी ४१ हजार २२५ विद्यार्थी शाळेत उपस्थित राहात आहेत.विद्यार्थी कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण शून्य असल्याने टप्प्याटप्प्याने शाळेतील उपस्थिती वाढण्याची शक्यता आहे. शासन आदेशानुसार जिल्ह्यातील शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. कोरोनाच्या भीतीमुळे पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नव्हते.
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्याचे प्रमाण चांगले आहे. शिवाय उपस्थितीही लक्षणीय आहे. शहरातील पालक अद्याप मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. त्यामुळे शाळा सुरू होण्याचे प्रमाण वाढले तरी विद्यार्थी उपस्थिती मात्र अजूनही घटलेलीच आहे.संक्रमणाचे प्रमाण शून्य टक्केजिल्ह्यातील शाळा सुरू होऊन एक महिना झाला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता ८ शिक्षक व २ कर्मचारी कोरोनाबाधित सापडले होते. मात्र, महिनाभरात विद्यार्थी संक्रमणाचे प्रमाण शून्य राहिले आहे. त्यामुळे पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. ४६ शाळांमध्ये मात्र अद्याप ऑनलाईनच अध्यापन सुरू आहे.
कोरोनामुळे शासनाच्या नियमावलींचे पालन करूनच अध्यापन सुरू आहे. शाळादेखील विद्यार्थ्यांचे तापमान व ऑक्सिजन मात्रा तपासूनच विद्यार्थ्यांना वर्गात घेत आहेत. बैठक व्यवस्थेबाबतही काळजी घेतली जात आहे. परिणामी शाळांकडून तसेच पालकांकडून घेण्यात येत असलेल्या काळजीमुळेच आतापर्यंत जिल्ह्यात एकही विद्यार्थी कोरोना संक्रमित सापडलेला नाही.- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी