रत्नागिरीत काँग्रेसचा अन्न सत्याग्रह, शासनाच्या धोरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 03:24 PM2018-03-20T15:24:29+5:302018-03-20T15:24:29+5:30
युती सरकारने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करून त्यांची फसवणूक केली आहे. त्याचबरोबर बागायतदार, मच्छीमार, डी. एड., बी. एड. उमेदवार यांचीही परवड होत आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस आणि बळीराजा शेतकरी संघटनेने अन्न सत्याग्रहाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना सर्व समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.
रत्नागिरी : युती सरकारने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करून त्यांची फसवणूक केली आहे. त्याचबरोबर बागायतदार, मच्छीमार, डी. एड., बी. एड. उमेदवार यांचीही परवड होत आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस आणि बळीराजा शेतकरी संघटनेने अन्न सत्याग्रहाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना सर्व समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांना १५०० रुपये क्विंटलचा भाव देऊनही फायदा झालेला नाही. सन २०१२-१३ला कोकणातील आंबा उत्पादकांना नुकसानभरपाईचे आलेले पैसे हे व्याजासह देणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, तेही मिळालेले नाहीत. त्यामुळे आंबा उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नारळ उत्पादकांना हमीभाव मिळत नाही. तसेच काजूचीही नुकसानभरपाई मिळालेली नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
आंदोलनात बळीराजा शेतकरी संघाचे कार्याध्यक्ष, काँग्रेसचे प्रवक्ते अशोक जाधव, दीपक राऊत, टी. एस. घवाळी, संतोष चव्हाण, अॅड. अश्विनी आगाशे, रूपाली मजगावकर, विनय मुकादम, कपील नागवेकर आदी सहभागी झाले होते.