रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथील सुप्रसिद्ध बहुरंगी नमन प्रथमच मुंबई शहरात रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी व कोकणची संस्कृती जपण्यासाठी श्री तळेकरीण देवीचे बहुरंगी नमन दामोदर हॉल, परळ, मुुंबई येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या बहुरंगी नमनाला मुंबईकरांनी व रसिक प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवप्रतिमेला व दत्ताजीराव नलावडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून झाले. यावेळी कमलाकर नलावडे, अनिल नलावडे, मोहन नलावडे, माजी सभापती सुभाष नलावडे, करजुवेचे सरपंच श्यामसुंदर माने, प्रशांत विचारे व मान्यवर उपस्थित होते. उद्घटनानंतर बहुरंगी नमनाचे कार्यक्रम सुरु झाले. यावेळी श्री जय तळेकरीण देवी नमन नाट्य मंडळ, करजुवे यांनी विद्रोही काळ अर्थात राष्ट्रभक्त सेनापती हे काल्पनिक वग नाट्य सादर केले. तसेच सिंदूर दैत्याचा वध मनमोहक देखाव्यात गणेशाचे पूजन, ठसकेबाज गौळण अशा विविध देखाव्यात मनोरंजनाचे बहुरंगी नमन सादर करुन मुंबईकरांना खूश केले व या कलेकडे लक्ष वेधून घेतले.श्री तळेकरीण बहुरंगी नमनाचा कार्यक्रम श्री तळेकरीण देवी मंदिर पब्लिक ट्रस्ट (करजुवे मुंबई मंडळ) यांच्या प्रयत्नाने मुंबईत पार पडला. हा कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी माजी सभापती सुभाष नलावडे, सरपंच श्यामसुंदर माने, समीर नलावडे, अशोक नलावडे, प्रशांत विचारे, मुंबई मंडळाचे कमलाकर नलावडे, सतीश नलावडे, अनिल नलावडे, मोहन नलावडे, मनोहर माने, विजय नलावडे ग्रामस्थ व गावकरी मंडळी यांनी मेहनत घेतली. (प्रतिनिधी)
करजुवे येथील नमनाने मुंबईकरांना मोहवल
By admin | Published: December 30, 2014 9:38 PM