खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात बुधवारी रात्री बर्निग कारचा थरार पाहावयास मिळाला. धावत्या कारने पेट घेतल्यानंतर कारचे दरवाजे लॉक झाल्याने कारमधील प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, वेळेत मिळालेली मदत आणि प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेतून तिघेही प्रवासी सुखरुप बचावले.मालेगाव येथील भंगार व्यवसायिक इस्माईलशेख शब्बीर हे आपले सहकारी रमझान इब्राहीम शहा आणि सरोज निजामुद्दीन खान यांच्यासोबत चिपळूण तालुक्यातील खेर्डी औद्योगिक वसाहतीत भंगार घेण्यासाठी आले होते. बुधवारी रात्री ते परतीच्या मार्गावर असताना महामार्गावरील कशेडी घाटात त्यांच्या वॅक्स व्हॅगन एमएच ०४, एफएफ-११६२ कारने अचानक पेट घेतला.कारमधून धूर यायला लागताच चालक इस्माईल यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी करून कारमधून उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारचे चारही दरवाजे लॉक झाल्याने ते सर्वजण कारमध्येच अडकून पडले. आता आपले पुढे काय होणार याची कल्पना आलेल्या या तिघांनीही आरडा-ओरडा सुरु केल्यानंतर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रसंगावधान राखत त्यांना कारचा मागील दरवाजातून बाहेर काढले. हे तिन्ही प्रवासी कारच्या बाहेर पडताच संपूर्ण कार आगीच्या भक्षस्थानी पडली.कारमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे कशेडी घाटातील हा बर्निंग कारचा थरार कारमधून प्रवास करणाऱ्या तिघांच्याही जीवावर बेतणारा होता. मात्र, त्यांचे दैव बलवत्तर म्हणून हे तिघेही प्रवासी या जीवघेण्या अपघातातून वाचले. खेड पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून, पोलीस प्रकाश मोरे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मुंबई - गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 6:45 PM
मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात बुधवारी रात्री बर्निग कारचा थरार पाहावयास मिळाला. धावत्या कारने पेट घेतल्यानंतर कारचे दरवाजे लॉक झाल्याने कारमधील प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, वेळेत मिळालेली मदत आणि प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेतून तिघेही प्रवासी सुखरुप बचावले.
ठळक मुद्देमुंबई - गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरारकशेडी घाटातील घटना, सुदैवाने तिघेही प्रवासी बचावले