शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

पालिका जाणार उच्च न्यायालयात

By admin | Published: March 09, 2015 9:33 PM

घनकचरा प्रकल्प : जिल्हासत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार

रत्नागिरी : दांडेआडोम येथे घनकचरा प्रकल्प उभारणीस मनाई करणारा निर्णय जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच दिला आहे. या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे पालिका सुत्रांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितले. त्यासाठी पालिका पदाधिकारी व अधिकारी कामाला लागले आहेत. शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील दांडेआडोम येथील अडीच एकर जागा रत्नागिरी पालिकेने घनकचरा प्रकल्पासाठी २००० साली खरेदी केली होती. त्यानंतर या जागेकडे जाण्यासाठी आवश्यक रस्त्याची जागा देण्यास ग्रामस्थांनी विरोध केला होता. त्यामुळे दहा वर्षांचा कालावधी या वादातच वाया गेला.दोन वर्षांपूर्वी पालिकेने रस्त्याची जागा संपादीत करून मिळावी, असा अर्ज जिल्हा प्रशासनाकडे केला होता. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपूर्वीच रस्त्याची जागा संपादन करून पालिकेच्या ताब्यात देण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्ष महेंद्र मयेकर व तत्कालिन मुख्याधिकारी यांनी दांडेआडोम येथे जाऊन तेथील सरपंच व नेत्यांशी चर्चा केली. त्यावेळीही या प्रकल्पाला विरोधच झाला. त्यानंतर हे प्रकरण प्रथम दिवाणी न्यायालयात गेले. तेथे ग्रामस्थांचे आक्षेप न्यायालयाने फेटाळले. अखेर तेथील गंगाराम आंबेकर, सुहास मुळ्ये, हरी माने, प्रकाश आंबेकर, रवींद्र पवार, पुरषोत्तम दांडेकर यांच्यासह १९ ग्रामस्थांनी या निर्णयाविरोधात जिल्हा न्यायालयात १२ फेबु्रवारी २०१५ रोजी याचिका दाखल केली होती. या प्रकल्पाबाबत पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाला सखोल माहिती नाही. तसेच पक्षकार जिल्हाधिकाऱ्यांकडून लेखी बाजू मांडण्यात आलेली नाही, असे नमूद करीत जिल्हा सत्रन्यायाधीश १ जे. पी. झपाटे यांनी दांडेआडोम हे ठिकाणी घनकचरा प्रकल्प नियमात बसणारे नाही, असा निर्णय दिला आहे. जिल्हा सत्रन्यायालयाच्या निकालास आव्हान देणारी याचिका पालिकेतर्फे उच्च न्यायालयात दाखल केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)