शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
इस्रायलच्या तेलानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
3
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
4
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
5
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
6
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
7
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
8
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
9
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
10
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
11
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
12
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
13
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
14
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
15
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
16
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
17
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
18
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
20
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल

Ratnagiri News: नाम फाउंडेशनतर्फे ‘वाशिष्ठी’त गाळ उपशाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 6:14 PM

दुसऱ्या टप्प्यातील गाळ उपसा धीम्या गतीने

चिपळूण : पूरमुक्त चिपळूण शहरासाठी पुढाकार घेतलेल्या नाम फाउंडेशनने वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा कामाला सुरुवात केली आहे. या कामाचा शुभारंभ नामचे मल्हार पाटेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रशासन, जलसंपदा विभाग, चिपळूण बचाव समिती आणि जनता या सर्वांच्या सहयोगातून पहिल्या टप्प्यातील गाळ उपशाचे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करू, असा विश्वास नाम फाउंडेशनचे विश्वस्त मल्हार पाटेकर यांनी व्यक्त केला.दुसऱ्या टप्प्यातील गाळ उपसा धीम्या गतीने सुरू असल्याने राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मुंबईत बैठक घेतली हाेती. या बैठकीत वाशिष्ठी नदीतील पहिल्या टप्प्यातील शिल्लक सर्व गाळ काढण्याची जबाबदारी नाम फाउंडेशनवर सोपविण्यात आली.प्रशासनाकडून आपल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळताच नाम फाउंडेशनने लाँग रिच बूम मशीनसह पाच पोकलेन व पाच डंपर चिपळुणात पाठविले. नाम फाउंडेशन व जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या या मोहिमेचा शुभारंभ पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला.शहरातील बाजारपूल परिसरातील गणेश विसर्जन घाट येथे गाळ उपसा कामाचा श्रीफळ वाढवण्यात आला. गाळ उपसा कामात कोणतीही अडचण अथवा समस्या निर्माण झाल्यास आवाज द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि कायम सोबत राहू, अशी ग्वाही बचाव समितीचे बापू काणे यांनी दिली. त्यानंतर जुवाड-उक्ताड बेट, गोवळकोट धक्का या भागातही गाळ उपसा कामाची सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर पाटेकर यांनी गाळ उपसा करणाऱ्या ठिकाणांची व कामाची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार, चिपळूण बचाव समितीचे अरुण भोजने, किशोर रेडीज, राजेश वाजे, उदय ओतारी, शाहनवाज शाह, नाम फाउंडेशनचे कोकण समन्वयक समीर जानवलकर, चिपळूण समन्वयक महेंद्र कासेकर, मंदार चिपळूणकर, छाया सकपाळ, पंचायत समिती सदस्य पूजा निकम, जफर कटमाले, पृथ्वी पवार, सचिन साडविलकर व अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीriverनदी