शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

नामफलकावरील सरपंचाचेच नाव गायब

By admin | Published: January 16, 2016 11:41 PM

लांजा तालुक्यातील प्रकार : नावावर पांढरा रंग मारल्याने ग्रामस्थांमधून नाराजी

लांजा : गोविळ व हसोळ या दोन गावांना जोडण्यासाठी गोविळ धोंडकोंड येथे बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या भूमिपूजन पाटीवरील गावच्या सरपंच व प्रतिष्ठीत नागरिक यांच्या नावावर पांढरा कलर मारुन नावे पुसण्याच्या खोडसाळपणा कुणी केला असावा, या विषयाची चर्चा संपूर्ण गावात सुरु झाली असून, या प्रकाराबद्दल ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ‘नाबार्ड’ योजनेंतर्गत १ कोटी १० हजार रुपये खर्च करुन गोविळ व हसोळ या दोन गावांना जोडण्यासाठी गोविळ धोंडकोंड येथे मोठा पूल उभारण्यात येत आहे. या कामाला प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतर प्रशासकीय स्तरावरुन या पुलाचा भूमिपूजन कार्यक्रम शुक्रवारी निश्चित करण्यात आला. यावेळी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवर देखील सरपंच व प्रतिष्ठीत नागरिक यांची नावे वगळण्यात आली होती. ज्या गावात शासकीय कार्यक्रम होत असतो. त्या गावच्या सरपंच व प्रतिष्ठीत नागरिक यांची नावे असणे आवश्यक असते. मात्र, त्यावेळी देखील ग्रामस्थांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर शुक्रवारी भूमिपूजनाची पाटी तयार करुन आणण्यात आली. त्यामध्ये गावच्या सरपंच व प्रतिष्ठीत नागरिक यांची नावे टाकण्यात आली होती. मात्र, त्या नावांवर पांढरा कलर मारुन ही नावे पुसण्यात आल्याची बाब येथील ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हा कार्यक्रम शासकीय आहे की शिवसेना संघटनेचा आहे, असा सवाल करत याबाबत नाराजी व्यक्त केली. या भूमिपूजन समारंभाच्या पाटीवर खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, प्रभारी सभापती आदेश आंबोळकर, जिल्हा परिषद सदस्य दत्ता कदम, पंचायत समिती सदस्या दीपाली दळवी, तालुकाप्रमुख संदीप दळवी, विभागप्रमुख शरद चरकरी, उपतालुकाप्रमुख दिलीप पळसुलेदेसाई, उपविभागप्रमुख सुभाष तावडे आदी मान्यवरांची नावे ठेवून सरपंच व गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांच्या नावावर पांढरा कलर मारुन ही नावे खोडण्यात आली आहेत. भूमिपूजनाचा कार्यक्रमाचे संबंधित ठेकेदार आयोजन करत असून, याचे नियोजन अधिकारी वर्गाकडून केले जात आहे. मात्र, गावच्या सरपंच व प्रतिष्ठीत नागरिक यांच्या नावांवर कलर मारुन ही नावे खोडण्याचा हा खोडसाळपणा नेमका कुणाच्या आदेशाने केला गेला आहे, याविषयी चौकशी करुन संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अन्यथा या कृ त्याबाबत जिल्हाधिकारी यांना भेटून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका व पाटीवरुन अशाप्रकारे नावे खोडण्याचा प्रकार हा खेदजनक असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)