चिपळूण : शहरातील भोगाळे या गजबजलेल्या परिसरात २४ वर्षीय परिचारिकेवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेला नराधम येथील पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. खेड तालुक्यातील लवेल येथील भंगार व्यावसायिक असलेल्या या नराधमाला रविवारी रात्री अटक केली. अवघ्या तीन दिवसांत येथील पोलिसांनी या आरोपीला पकडल्याने त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे. चार दिवसांपूर्वी चिपळूण शहरातील भोगाळे परिसरात एका २४ वर्षीय परिचारिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर अत्याचार करणारा नराधम पसार झाला होता. पोलिसांनी संबंधित नराधमाचा शोध घेण्यासाठी दोन पथकांच्या माध्यमातून मोहीम राबवली. यामध्ये पोलिसांना मध्यवर्ती बसस्थानक व भोगाळे येथील दीपक लॉज समोरील सीसीटीव्ही फुटेज हाती लागले होते.पीडित तरुणीने वर्णन केल्याप्रमाणे एक तरुण त्यामध्ये कैद झाला होता. त्यामुळे संबंधित तरूणाच्या हालचाली व चालण्याच्या पद्धतीवरून पोलीस त्याचा शोध घेत होते. याचवेळी दुसरे पथक पीडित तरुणीचा मोबाईल व छत्री घटनास्थळावरून गायब झाल्याने त्या नराधमानेच नेली असावी, अशी शंका घेत त्या मोबाईलचे लोकेशन तपासले. तर ते लोकेशन खेड तालुक्यातील सात्विनगाव व लवेल दरम्यान आढळले.त्याप्रमाणे येथील पोलिसांनी आपल्या तपासाचा मोर्चा लवेलच्या दिशेने वळवला. यावेळी एका व्यक्तीने भंगारवाल्याच्या तीन मुलांपैकी मोठा मुलगा या पद्धतीने दिसतो, असे सांगितले. त्याप्रमाणे पोलिसांनी संबंधित भंगरवल्याकडे काही बोगस व्यक्ती पाठवून त्या तरूणाच्या हालचाली व आवाज टिपला. तीनवेळा अशा पद्धतीने प्रयोग केल्यानंतर तोच असल्याची पोलिसांची खात्री पटली. अखेर रविवारी रात्री त्याला अटक केली. येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी बजावली.व्यक्ती विवाहित, आठ महिन्यांची मुलगीआरोपी हा विवाहित असून, त्याला आठ महिन्याची मुलगीही आहे. घटनेच्या दोन दिवस आधी तो तीन हजार रुपये घेऊन घराबाहेर पडला होता. त्यानंतर मुंबई एसटीने पनवेल येथे गेला होता. पुन्हा मुंबई येथून तो बसने गुरुवारी दुपारी चिपळुणात आला. सायंकाळी तो बस स्थानकाच्या आवारात फिरत होता. त्यानंतर त्याने संबंधित पीडित तरुणी रस्त्याने एकटी जात असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
परिचारिकेवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 19:25 IST
Crimenews Chiplun Police Ratnagiri : चिपळूण शहरातील भोगाळे या गजबजलेल्या परिसरात २४ वर्षीय परिचारिकेवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेला नराधम येथील पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.
परिचारिकेवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम पोलिसांच्या जाळ्यात
ठळक मुद्देपरिचारिकेवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम पोलिसांच्या जाळ्यात चिपळूण पोलिसांना मोठे यश, दोन दिवसांत काढले शोधून खेड तालुक्यातील लवेल येथील भंगार व्यावसायिक असलेल्या या नराधमाला रविवारी रात्री अटक केली.