चिपळूण : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर चिपळूणमध्ये प्रथमच पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा १ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता कापसाळ येथील माटे सभागृहात होणार आहे. या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची तोफ धडाडणार आहे.
यानिमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. पक्षाचे सरचिटणीस नीलेश राणे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. चिपळुणात मेळावा घेऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देण्याचा हा प्रयत्न आहे.
या मेळाव्याच्या नियोजनासाठी कापसाळ येथील विश्रामगृहात पक्षाच्या उत्तर रत्नागिरीमधील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ज्येष्ठ नेते मंगेश शिंदे व नगरसेवक परिमल भोसले यांनी मार्गदर्शन केले.याबाबत माहिती देताना शिंदे म्हणाले की, आपण सर्वांनी हातात हात घालून, खांद्याला खांदा भिडवून आणि राणे यांच्या पावलावर पाऊल ठेवून संघटना बळकट करूया. विकासकामांसाठी राणे यांचे आपल्या सर्वांना नेहमीच सहकार्य राहील. अनेक गावांमधील विकासकामांसाठी खासदार निधीतून पूर्वीप्रमाणेच निधी प्राप्त होईल, असे अभिवचन राणे यांनी दिले असल्याचे यावेळी सांगितले.यावेळी नगरसेवक भोसले म्हणाले की, नारायण राणे यांचे हात अधिक बळकट करण्याची वेळ आली आहे. याकरिता कार्यकर्त्यांनी स्वत:ला झोकून देत काम करावे. तसेच तळागाळात पक्ष मजबूत होण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करूया, असे आवाहन केले.यावेळी नगरसेवक सुधीर शिंदे, शांताराम शिरकर, गणपत शिंदे, पांडुरंग पिलवारे, वैभव वीरकर, प्रफुल्ल पिसे, शौर्य निमकर, विष्णू बैकर, सुरेश सुर्वे, दीपक शिंदे, महेंद्र इंगावले, खेड तालुकाध्यक्ष सचिन घाडगे, चंद्रशेखर राणे, अनंत लाखण, महेंद्र सुर्वे, विजय पेवेकर, दत्ताराम चांदिवडे, हरिश्चंद्र रहाटे, सुधीर पानकर, शैलेश शिंदे, बळीराम पांचांगळे, विलास इंगावले, अभिषेक जागुष्टे, आयूब खान, शुभम पिसे, इक्बाल रुमाणे उपस्थित होते.चिपळूण तालुका कार्यकारिणी जाहीरया बैठकीत तालुकाध्यक्ष अजय साळवी यांनी चिपळूण तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये युवक तालुकाध्यक्ष म्हणून आशिष शिंदे, तालुका उपाध्यक्षपदी इरशाद मुल्लाजी, युवक शहराध्यक्ष म्हणून प्रतीक मसुरकर व युवक तालुका उपाध्यक्षपदी रोहन साळवी यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले.