शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

शोध निबंधाचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान

By admin | Published: May 12, 2016 11:15 PM

सतीश लळीत यांची माहिती : कुडोपीतील पाषाणचित्रे, कलाविषयक ग्रंथात समावेश

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी येथील पाषाण चित्रांवरील सतीश लळीत यांच्या शोध निबंधाचा समावेश 'रॉक आर्ट : रिसेंट रिसर्चेस अँड न्यु पर्स्पेक्टिव्हज’ या राष्ट्रीय पातळीवरील ग्रंथात करण्यात आला आहे. ग्रंथाचे संपादक केरळ विद्यापीठातील पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजित कुमार यांनी तसे आपल्याला कळविल्याची माहिती हौशी पुरातत्व संशोधक सतीश लळीत यांनी दिली आहे.याबाबत प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात लळीत यांनी म्हटले आहे की, डॉ. अजित कुमार हे प्रख्यात पुरातत्व शास्त्रज्ञ असून पुणे येथील डेक्कन महाविद्यालयातून त्यांनी पुरातत्व शास्त्राची पदव्युत्तर पदवी आणि तंजावर विद्यापीठाची डॉक्टरेट मिळविली आहे. अनेक शोध निबंध आणि पुस्तकांचे लेखक असलेल्या डॉ. अजित कुमार यांनी भोपाळ (मध्यप्रदेश) येथील ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. यशोधर मठपाल यांच्यावर दोन खंडांचा गौरवग्रंथ संपादित केला आहे. भारत आणि अन्य देशांमध्ये अलिकडच्या पाषाणकला विषयक (रॉक आर्ट) संशोधनांचा आणि शोध निबंधांचा या गौरव ग्रंथामध्ये समावेश आहे. त्यात क्युबा, पेरु, इटली आणि पाकिस्तान या चार देशांतील संशोधकांच्या आणि भारतातील १९ राज्यांमधील संशोधकांच्या शोध निबंधांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून कांतिकुमार पोवार आणि सतीश लळीत या दोघांचे शोधनिबंध निवडण्यात आले आहेत. डॉ. अजित कुमार यांनी आवर्जून संपर्क करुन शोधनिबंध मागवुन घेतला आणि त्याचा ग्रंथात समावेश केला, अशी माहिती लळीत यांनी दिली. कुडोपी (ता. मालवण) येथील पाषाण चित्रांवरील शोधनिबंधात १४ छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पाषाणकला पुन्हा एकदा मोठ्या कॅनव्हासवर आली आहे, अशी भावना लळीत यांनी व्यक्त केली आहे. हा गौरवग्रंथ ५५० पृष्ठांचा असून दोन खंडांचा आहे. नवी दिल्ली येथील न्यू भारतीय बुक कॉपोर्रेशनने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. (प्रतिनिधी)