चिपळूण : शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांना पराभूत करून राष्ट्रवादीचे शेखर निकम प्रथमच विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांनी चव्हाण यांचा २९ हजार ९२४ मतांनी पराभव केला.चिपळूणमधील शिवसेनेची जागा धोक्यात असल्याचा आणि तेथे चुरशीची निवडणूक होणार असल्याचा अंदाज आधीपासूनच होता. भास्कर जाधव राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झाल्यामुळे शिवसेनेची मते वाढतील, असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात शिवसेनेला चिपळुणात जोरदार फटका बसला आहे. शेखर निकम यांना १ लाख १ हजार ५७८ तर सदानंद चव्हाण यांना ७१ हजार ६५४ मते मिळाली आहेत.गत निवडणुकीत हेच दोन उमेदवार आमनेसामने होते. त्यात सदानंद चव्हाण सहा हजार मतांनी विजयी झाले होते. पराभूत झाल्यानंतर लगेचच शेखर निकम यांनी मतदार संघात कामाला सुरूवात केली होती. सत्ता नसतानाही अनेक ठिकाणचे पाणीप्रश्न त्यांनी स्वबळावर सोडवले. त्यामुळे यावेळी जिल्ह्यात या मतदार संघात बदल होण्याची शक्यता आधीपासून वर्तवण्यात येत होती.गुरूवारी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच शेखर निकम यांनी आघाडी घेण्यास सुरूवात केली. त्यांना दर फेरीमध्ये मिळणारी आघाडी पाहून आठव्या फेरीनंतर शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण मतमोजणी कक्षातून निघून गेले.
Maharashtra Assembly Election 2019 चिपळुणातून राष्ट्रवादीचे शेखर निकम प्रथमच विधानसभेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 3:59 PM
गुरूवारी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच शेखर निकम यांनी आघाडी घेण्यास सुरूवात केली. त्यांना दर फेरीमध्ये मिळणारी आघाडी पाहून आठव्या फेरीनंतर शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण मतमोजणी कक्षातून निघून गेले.
ठळक मुद्दे जिल्ह्यात या मतदार संघात बदल होण्याची शक्यता आधीपासून वर्तवण्यात येत होती.