रत्नागिरी : जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामध्ये चिपळूण शहर, कालुस्ते, गोवळकोट, खेर्डी, पाग, शंकरवाडी तसेच आजुबाजूच्या परिसरात अतिवृष्टी होऊन महाभयंकर पूर आल्यामुळे पशुपालकांना जनावरांना खाऊ घालण्यासाठी हिरवी वैरण, सुकी वैरण, पशुखाद्य, मिनरल मिक्स्चर औषधांची आवश्यकता आहे.
चिपळूण तालुक्यामध्ये चिपळूण शहर, कालुस्ते, गोवळकोट, खेर्डी, पाग, शंकरवाडी तसेच आजुबाजूच्या परिसरात अतिवृष्टी होऊन महाभयंकर पूर आल्यामुळे पशुपालकांकडील जनावरे मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहेत तसेच काही जनावरे जखमीसुद्धा झाली आहेत. त्यामुळे पशुपालकांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. पुराचे पाणी घरात, गोठ्यात, वाड्यात शिरल्यामुळे त्यांच्याकडे असलेली हिरवी वैरण, सुकी वैरण, पशुखाद्य, मिनरल मिक्स्चरसुद्धा पुराच्या प्रवाहात वाहून गेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या जनावरांना खाऊ घालण्यासाठी हिरवी वैरण, सुकी वैरण, पशुखाद्य, मिनरल मिक्स्चर, औषधांची गरज आहे.
पशुपालकांवर आलेल्या संकटात त्यांना मदत करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पशुपालकांकडील जनावरांसाठी हिरवी वैरण, सुकी वैरण, पशुखाद्य, मिनरल मिक्स्चर व औषधे आदी स्वरूपात मदत करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. डॉ. डी. डी. जगदाळे (जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, चिपळूण ९४२३३३६१४३), डॉ. वाय. बी. पुजारी (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी ९८२२८९७७२३), व्ही. एस. बारापात्रे, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, चिपळूण (९५२७०८८२०६९) यांच्याशी संपर्क करावा.