अडरे : बूथ संपर्क अभियानाअंतर्गत चिपळूण भाजप तालुका कार्यकारिणी बैठक चिपळूण येथे पार पडली. उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष डाॅ. विनय नातू यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयाेजित करण्यात आली हाेती. या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांनी तालुका कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, जिल्हा संघटन सरचिटणीस नागेश धाडवे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष मालप, शिक्षक सेल जिल्हा संयोजक सोमनाथ सुरवसे, कोकण विकास आघाडी मुंबई चिपळूण तालुका संपर्कप्रमुख संतोष शिंदे यांच्यासह जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित हाेते.
यावेळी ओवळीतील शिवसेनेचे युवा कार्यकर्ते अभिजित शिंदे, शरद शिंदे, सतीश शिंदे, शैलेश शिंदे तसेच वालोटीतील संगीता जाधव यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या बैठकीमध्ये तालुका कार्यकारिणी पदाधिकारी, मोर्चा, आघाडी, पदाधिकारी यांच्या मध्ये बदल करून नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदावर अभिजित शिंदे, युवा मोर्चा सरचिटणीसपदी अमोल रावणंग, युवा मोर्चा उपाध्यक्ष पदावर प्रथमेश भोबस्कर, महिला मोर्चा तालुकाध्यक्षपदावर सीमा महाडिक, सरचिटणीस सुखदा इंदुलकर व संगीता जाधव, उपाध्यक्ष रेश्मा शिंदे, आदिती भोबस्कर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच तालुका चिटणीस रमेश डोंगरे, ओबीसी मोर्चा तालुका सरचिटणीस सोनू धुमक, प्रद्मा सेल तालुका संयोजक अशोक पवार, तालुका कार्यकारिणी सदस्य रमेश शिंदे, काशिनाथ इंगवले यांना नियुक्तीपत्र देऊन जबाबदारी देण्यात आली.
चाैकट
विविध उपक्रम
पक्षाचा ६ एप्रिल रोजी स्थापना दिन आहे. या दिवशी प्रत्येक बूथवर बैठक घेऊन पक्षाचा झेंडा लावणे तसेच १४ एप्रिल रोजी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रत्येक बूथवर साजरी करणे, बूथ प्रभारी, शक्तिकेंद्र प्रमुख यांनी बूथवर जाऊन कमिटी तयार करावी, अशा प्रकारे काम करण्याचे आवाहन केले.