शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

‘ती’ नितेशची चूकच, मात्र 'त्यावेळी' राष्ट्रप्रेमी मुस्लीम बाजू का घेत नाहीत; नारायण राणेंनी केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 12:19 PM

चिपळूण : नितेश राणे यांनी मशीद हा शब्द वापरायला नको होता, ती त्याची चूकच होती. मात्र या देशात राहणारे ...

चिपळूण : नितेश राणे यांनी मशीद हा शब्द वापरायला नको होता, ती त्याची चूकच होती. मात्र या देशात राहणारे राष्ट्रप्रेमी मुस्लीम जेव्हा हिंदू समाजावर, हिंदू महिला व मुलींवर अत्याचार होतो, त्यावेळी का बाजू घेत नाहीत, असा प्रश्न खासदार नारायण राणे यांनी रविवारी उपस्थित केला.खा. नारायण राणे रविवारी चिपळूण दौऱ्यावर आले हाेते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आ. नितेश राणे यांनी मुस्लीम समाजाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत त्यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, नितेश राणे यांनी याबाबत अगाेदरच खुलासा केला आहे. त्यांना तसे बाेलायचे नव्हते. जर तुम्ही आमच्या देशात येऊन अतिरेकी कारवाया करणार असला तर आम्ही करू, असे त्यांना बाेलायचे हाेते. मात्र त्यांनी मशीद शब्द उच्चारायला नकाे हाेता. ती चूक झाली, असे खासदार राणे म्हणाले.राणे पुढे म्हणाले की, सगळेच मुसलमान वाईट नाहीत, भारताबद्दल प्रेम असणारे, भारताचे नागरिक असणारेही मुस्लीम आहेत. पण आमच्या समाजावर, महिलांवर अत्याचार हाेताे, त्यावेळी राष्ट्रप्रेमी मुस्लीम का बाजू घेत नाहीत. आज नितेश राणे ताेंड बंद करतील, पण दुसरा नितेश तयार हाेईल, दुसरा नारायण राणे तयार हाेईल, असेही राणे म्हणाले.खा. शरद पवार यांच्या टीकेलाही उत्तर देताना खा. राणे म्हणाले की, शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री हाेते. त्यावेळी अत्याचार थांबण्यासाठी त्यांनी काही केले नाही, तुम्ही तीन हजार द्यायचे हाेते, त्यावेळी अशी चांगली याेजना आठवली नाही तुम्हाला, असा प्रश्नही केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणNarayan Raneनारायण राणे Muslimमुस्लीमNitesh Raneनीतेश राणे