शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

Alphonso mango: आता 'ॲमेझॉन'वर मिळणार ‘हापूस’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 2:20 PM

ॲमेझॉनचे महाराष्ट्रातील चौथे तर भारतातील सातवे संकलन केंद्र आहे. बागायतदारांकडून आंबा विकत घेऊन मुंबई तसेच पुण्यातील ॲमेझॉनच्या ग्राहकांना पोहाेचवला जाणार आहे.

रत्नागिरी : ऑनलाईन खरेदी-विक्रीमध्ये अग्रेसर असणाऱ्या ‘ॲमेझॉन’ कंपनीने आता आंबा खरेदीला प्रारंभ केला आहे. कंपनीतर्फे शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसीमध्ये आंबा संकलन केंद्र सुरू केले आहे. सुरुवातीला १२ शेतकऱ्यांकडून ६०० डझन आंब्याची खरेदी करण्यात आली आहे. १८५ ते २२० ग्रॅमपर्यंतचा पिकलेला हापूस आंबा प्रति डझन ९०० रुपयांनी खरेदी करण्यात येत आहे.रत्नागिरीतील आंबा संकलन केंद्राचे उद्घाटन पणन मंडळाचे सरव्यवस्थापक मिलिंद जोशी, आंबा बागायतदार समीर दामले, प्रमुख व्यवस्थापक राजेश प्रसाद, विवेक धवन, सुजय हेगडे, नरेंद्र जवळ यांच्यासह बागायतदार उपस्थित होते. ॲमेझॉनचे महाराष्ट्रातील चौथे तर भारतातील सातवे संकलन केंद्र आहे.

बागायतदारांकडून आंबा विकत घेऊन मुंबई तसेच पुण्यातील ॲमेझॉनच्या ग्राहकांना पोहाेचवला जाणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर परदेशात आंबा निर्यातीचा मानस असल्याचे सांगितले. आंबा खरेदी केल्यानंतर बागायतदाराला त्वरित पैसे दिले जाणार आहेत. आंबा बागायतदार राजेश पालेकर यांच्या सूचनेनुसार पुढील आठवड्यापासून लहान आकाराचाही आंबा खरेदी केली जाणार आहे.आंबा संकलन केंद्राच्या उद्घाटनानंतर मिलिंद जोशी यांनी मार्गदर्शन करताना, कोरोनामुळे बागायतदार दलालावर अवलंबून न राहता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वत:च विक्री सुरू केली आहे. ॲमेझॉनसारख्या कंपन्या थेट विक्रीसाठी येऊ लागल्यामुळे शेतकऱ्याला दर ठरवता येणार असून, ही एक नवी संधी आहे, असे सांगितले.समीर दामले यांनी मनोगत व्यक्त करताना बागायतदार पूर्वी दलालावर अवलंबून असल्याने दलाल सांगेल तोच दर ठरवला जात हाेता; मात्र आता कंपनी थेट खरेदी करत असल्याने दर चांगला प्राप्त होणार आहे. शिवाय जीआयमुळे (भौगोलिक मानांकन) गुणवत्तेला प्राधान्य मिळणार असल्याचे सांगितले.

ॲमेझॉनच्या माध्यमातून हापूसला चांगला दर मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. शिवाय बागायतदारांना गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी आवश्यक खते, औषधे, साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी ॲप विकसित केले जाणार आहे. याबाबत वेगळ्या पद्धतीने काम करण्याचे उद्दिष्ट आहे. हापूसची खरेदी हे ध्येय न ठेवता शेतकऱ्यांच्या हितार्थ विचार सुरू आहे. - राजेश प्रसाद, प्रमुख व्यवस्थापक, ॲमेझॉन

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाamazonअ‍ॅमेझॉन